shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ताडपत्री ते फ्लॅट – गौरव मोरेच्या घराचं स्वप्न अखेर पूर्ण!ज्येष्ठ पत्रकार दत्ता पवार यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

लोकप्रिय अभिनेता आणि कॉमेडियन गौरव मोरे याने आपल्या आयुष्यातील मोठं स्वप्न पूर्ण केलं आहे. 
फिल्टर पाडा सारख्या साध्या झोपडपट्टीत ताडपत्राखाली जगण्यापासून ते आज MHADA चं घर मिळेपर्यंतचा त्याचा प्रवास खूप प्रेरणादायी ठरला आहे. गौरव मोरे याने शून्यातून विश्व निर्माण केले असून त्यामुळे त्याचे कौतुक होत आहे.
गौरवने सोशल मीडियावर भावुक होत सांगितलं की, “ताडपत्रीखालून आज मी फ्लॅटपर्यंत आलो. आणि ते खरंही आहे तो सुरुवातीला ताडपत्री खाली राहत होता पण आता त्याने मोठा घर घेतला आहे.

 हे घर फक्त विटा आणि सिमेंटचं नाही, तर माझ्या संघर्षाचं, मेहनतीचं आणि चाहत्यांच्या प्रेमाचं प्रतीक आहे.”
त्याच्या या पोस्टवर चाहते आणि सहकलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अनेकांनी त्याला ‘प्रेरणा देणारा कलाकार’ असं म्हटलं आहे. त्याच्या या कर्तृत्वाची खऱ्या अर्थाने प्रेरणा घेतली जात आहे.खरंच, छोट्या झोपडपट्टीतून सुरू झालेला प्रवास आज MHADA च्या घरात स्थिरावतोय हीच त्याच्या मेहनतीची खरी कमाई आहे.

गौरव मोरेच्या या कहाणीने पुन्हा एकदा सिद्ध केलं की स्वप्नं खरी होतात, फक्त हार मानता कामा नये.
close