श्रीरामपूर | प्रतिनिधी
श्रीरामपूर येथील थत्ते मैदानावर रामनवमी उत्सवाचा उत्साह सुरू असतानाच एका चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. सुदैवाने, स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे ही आग वेळीच विझवण्यात आली आणि मोठा अनर्थ टळला. नेमकी घटना रामनवमीनिमित्त थत्ते मैदानावर रहाट पाळणे आणि विविध दुकाने थाटली असल्याने परिसरात मोठी गर्दी होती. श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल संदीप दरंदले हे आपले कर्तव्य बजावण्यासाठी आले होते. त्यांनी आपली चारचाकी गाडी मैदानापासून काही अंतरावर पार्क केली होती. मात्र, काही वेळातच वाहनात तांत्रिक बिघाड होऊन उभ्या गाडीने अचानक पेट घेतला.
गाडीतून धूर निघत असल्याचे पाहताच परिसरातील नागरिकांनी आरडाओरड केली आणि आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. घटनेची माहिती मिळताच:
गृह रक्षक दलाचे राजेंद्र देसाई यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. व पोलीस हवालदार मच्छिंद्र शेलार व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने मदतीसाठी आवाहान केले .
सामाजिक कार्यकर्ते संघर्ष दिघे आणि त्यांच्या मित्रमंडळाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्यात मोठी भूमिका बजावली.
शेजारील एक बोअरवेल सुरू करून त्याद्वारे पाण्याचा मारा करण्यात आला, ज्यामुळे आग आटोक्यात आली. प्रशासनाचे आवाहन
घटनेनंतर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी गोंधळून न जाता शांतता राखण्याचे आवाहन नागरिकांना केले, तसेच मदत करणाऱ्या सर्व युवकांचे व नागरिकांचे आभार मानले. सहाय्यक फौजदार विलास घाणे पोलीस हवालदार मच्छिंद्र शेलार लक्ष्मण वैरागर पो कॉ पानसंबळ यांनी यात्रेकरूंना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
भरवस्तीत आणि गर्दीच्या ठिकाणी ही आग लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र वेळीच झालेल्या मदतीमुळे संदीप दरंदले यांच्या वाहनाचे नुकसान टळले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. संघर्ष दिघे खडु गागुर्डे भाऊसाहेब जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांच्या या धाडसाचे शहरभर कौतुक होत आहे.

