वांबोरी (प्रतिनिधी) : येथील मोरेवाडी परिसरातील वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ वारकरी पांडुरंग मोरे यांचे चिरंजीव बापुसाहेब पाटील मोरे (वय ६४) यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने वांबोरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बापुसाहेब मोरे यांनी काही काळ कॅनरा बँकेत नोकरी केली होती. मात्र नोकरीत मन न रमत असल्याने त्यांनी शेती व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि शेतीतच आपले आयुष्य घालवले. साधा, धार्मिक आणि कुटुंबवत्सल स्वभावामुळे ते परिसरात परिचित होते. धार्मिक तसेच कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये ते नेहमी सक्रिय सहभाग घेत असत.
त्यांच्या पश्चात एक भाऊ, तीन बहिणी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. श्रीरामपूर येथील विलास घुले यांचे ते मामे बंधू होते, तर राहुरी येथील वन विभागातील फील्ड ऑफिसर गोरक्षनाथ मोरे यांचे ते ज्येष्ठ बंधू होते. मोरेवाडी येथील शेती उद्योजक रामेश्वर व आदिनाथ मोरे यांचे ते वडील होत.
त्यांच्या निधनाने कुटुंबीयांसह मित्रपरिवार व परिसरातील नागरिकांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

