पिठेवाडी येथे सुरू असलेल्या बंधाऱ्याची दुरुस्ती दर्जेदार व्हावी - किरण पाटील.
इंदापूर: पिठेवाडी ,चाकाटी, चाकोरे नीर निमगाव या परिसरातील पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीच्या पाण्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेला पिठेवाडी येथे बंधाऱ्याचे दुरुस्ती काम सुरू असून हे काम दर्जेदार पद्धतीने झाले पाहिजे यासाठी कामाची पाहणी करून संबंधित ठेकेदाराला काम दर्जेदार करण्यासंबंधीच्या सूचना पंचायत समिती सदस्या धनश्री पाटील यांचे प्रतिनिधी म्हणून किरण पाटील तसेच पिठेवाडी गावचे सरपंच समाधान जानकर , प्रशांत घोडके, किरण खुरंगे , बापुराव मारकड, किशोर पाटील, अभिजीत झांबरे , गणेश शेंडगे तसेच चाकाटी , पिठेवाडी , चाकोरे परिसरातील तरुण शेतकऱ्यांनी दिनांक 10 एप्रिल रोजी दिली असल्याची माहिती किरण पाटील यांनी दिली.
तसेच माहिती देताना किरण पाटील म्हणाले की पिठेवाडी येथे सुरू असलेल्या बंधाऱ्याची दुरुस्ती दर्जेदार व्हावी . जेणेकरून पुढील काळात ा बंधार्यातून पाण्याची गळती न होता पाणी जास्त काळ टिकून राहून व या पाण्याचा उपयोग या परिसरातील शेतीसाठी होईल .

