साई शिर्डी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे भव्य आयोजन; नियोजन बैठक, स्नेहभोजन व नागरी सत्कार कार्यक्रमाने शिर्डीत उत्साहाचे वातावरण
शिर्डी प्रतिनिधी: ( तुषार महाजन )
साई शिर्डी चॅरिटेबल ट्रस्ट, शिर्डी व शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने २५ व्या रौप्यमहोत्सवी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून, यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दि. १९ एप्रिल २०२६ रोजी गोरज मुहूर्तावर २५ व्या रौप्यमहोत्सवी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर शनिवार दि. १८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता साई किमया गार्डन, एअरपोर्ट रोड, शिर्डी येथे नियोजन बैठक, नागरी सत्कार व मांडव डहाळे स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मा. खा. डॉ. सुजयदादा विखे पाटील यांचा भव्य नागरी सत्कार होणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मा. खा. डॉ. सुजयदादा विखे पाटील (भा. ज. पा. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष) उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे नियोजक म्हणून मा. श्री. कैलास (बापू) गोविंदराव कोते पाटील (प्रथम नगराध्यक्ष, शिर्डी नगरपंचायत), मा. सौ. सुमित्राताई कैलास (बापू) कोते पाटील (प्रथम महिला नगराध्यक्ष, शिर्डी नगरपंचायत), मा. श्री. भगीरथभाऊ होन (सचिव), मा. श्री. विजयाराव तुळशीराम कोते पाटील (अध्यक्ष साई निर्माण समूह), मा. श्री. अरविंद आप्पा कोते पाटील (नगरसेवक, शिर्डी नगरपरिषद), मा. श्री. उत्तम (भैय्या) कोते पाटील (उपाध्यक्ष), मा. श्री. धनराज कैलास (बापू) कोते पाटील (नगरसेवक, शिर्डी नगरपरिषद) तसेच मा. श्री. हरिश्चंद्र (सचिन) कोते पाटील (मा. उपनगराध्यक्ष, शिर्डी नगरपरिषद) आदी मान्यवरांचा सहभाग आहे.
सदर कार्यक्रमासाठी समस्त कोते पाटील परिवार व शिर्डी ग्रामस्थ यांनी पुढाकार घेतला असून, मोठ्या उत्साहात तयारी सुरू आहे. सर्व नागरिकांनी आपला बहुमूल्य वेळ काढून या सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. ठिकाण: साई किमया गार्डन, एअरपोर्ट रोड, शिर्डी येथे हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

