📌सैनिक पत्नी पूनम कदम यांची कागदोपत्री अडवणूक करून मानसिक छळ प्रकरणी फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी..
📌वाढीव पाणीपट्टी संदर्भात ठराव रद्द करण्याची मागणी..
📌 अतिक्रमण काढताना नगरपरिषदेकडून होणारा भेदभाव रोखणेची मागणी..
📌 आठवडे बाजार कर वसुली व अन्य नगरपरिषदेच्या वाढीव कर वसुली संदर्भात निवेदन..
अहिल्यानगर दि. १३ एप्रिल
देवळाली प्रवरा येथील सैनिक पत्नी पुनम कदम यांच्या वतीने त्यांच्यावर झालेल्या अन्याया बाबत मा. जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देऊन न्याय मागण्यात आला. नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यावर मानसिक छळाचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पोलिसांना आदेश देण्यात यावे.. तसेच वाढीव पाणीपट्टी कमी करण्यासाठी झालेला ठराव रद्द करण्यात यावा अशी मागणी आज महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे वतीने जिल्हाधिकारी साहेब यांचेकडे करण्यात आली.
नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये वाढीव पाणीपट्टी धोरणाच्या विरोधामध्ये नागरिकांनी नुकतेच नगरपालिकेसमोर आंदोलन करून निषेध नोंदवला होता .. परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी यांनी नगरपरिषदेचा ठराव तात्काळ रद्द करावा अशी चर्चा शिष्टमंडळाने यावेळी केली केली, अन्यथा तुमच्या विरोधात कोर्टात सुद्धा जावे लागेल अशी भूमिका शिष्टमंडळाने घेतली व नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी सेवा कर तसेच आठवडे बाजारामध्ये व्यापारांकडून नगरपरिषदेची कर वसुली व अतिक्रमण काढण्याच्या संदर्भामध्ये लोकांवर केलेल्या अन्यायाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली..
प्रसंगी महाविकास आघाडीचे गटनेते दासूभाऊ तुकाराम पठारे, नगरसेविका सुनिता सुरेंद्र थोरात, नगरसेवक शरद वाळुंज, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस, पूनमताई कदम, महाविकास आघाडीचे वैभव गिरमे, दत्ता कडू पाटील, अँड कुमार भिंगारे अनिल चव्हाण वसंत कदम, सुनील वाळुंज, गणेश भालके व स्नेहलताई दिवे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

