shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बेकायदा गर्भलिंग तपासणी प्रकरणी श्रीरामपूरातील नामांकित डॉक्टर अटकेत; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

श्रीरामपूर प्रतिनिधी – श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अस्तगाव-निर्मळ पिंप्री परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी व गर्भपात केंद्रावर पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत यापूर्वीच डॉ. राहुल भनगे (रा. नेवासा) तसेच दोन एजंट अभिजित भुसाळ व प्रदीप ढगे यांना अटक करण्यात आली होती.


या प्रकरणामुळे जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, समाजात सुरू असलेल्या मुलींच्या गर्भपाताच्या अमानवी प्रकारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांच्या ठोस आणि गुप्त कारवाईमुळे हा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने विविध स्तरांतून संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास अधिक खोलात सुरू असताना श्रीरामपूर शहरातील नामांकित व प्रसिद्ध डॉक्टर डॉ. रविंद्र कुटे (रा. श्रीरामपूर) यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेमुळे राहाता व श्रीरामपूर परिसरातील वैद्यकीय क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

या संपूर्ण प्रकरणात आणखी कोणाचे संबंध आहेत का, याचा तपास पोलीस करीत असून चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अधिकृत तपास अहवालानंतरच संपूर्ण प्रकरणाचे वास्तव स्पष्ट होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
०००००
close