शिर्डी प्रतिनिधी :
शिर्डी येथील साई श्रद्धा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा पत्रकार संजय महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्य, पत्रकारिता आणि जनसेवेतील त्यांच्या योगदानाबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिर्डी विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन आप्पासाहेब तुकाराम कोते यांच्या हस्ते संजय महाजन यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दत्तात्रय गोंदकर, साई श्रद्धा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक आसारामजी वारे यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.
संजय महाजन हे अनेक वर्षांपासून पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि साईसेवेच्या माध्यमातून समाजहितासाठी कार्यरत असून, त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात उपस्थितांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच त्यांना निरोगी, आनंदी व यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

