shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निपाणी वडगाव येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी...!

मिरवणूक, सुशोभिकरण, ढोल-ताशांचा गजर; पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा जयंती उत्सव समितीतर्फे सन्मान

वडाळा महादेव [प्रतिनिधी] दि. ३१  मे: श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथे समाज बांधव, ग्रामस्थ व जयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 

यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ वाजता मान्यवरांच्या हस्ते अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यानिमित्त संपूर्ण परिसरात सुशोभिकरण करण्यात आले होते. निपाणी फाटा ते गावापर्यंत माता-भगिनींनी एकत्र येत रस्त्यावर सडा-रांगोळीचा उपक्रम राबवला. संपूर्ण गाव अहिल्यामय झाले होते.
सायंकाळी जागृत देवस्थान श्री वीरभद्र मंदिरापासून ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी वरुण राजानेही हजेरी लावल्याने वातावरणात अधिकच उत्साह संचारला. मिरवणुकीत पारंपरिक संवादय बँड पथकाने आपल्या सुमधुर वादनाने सर्वांची मने जिंकली. 'जय मल्हार', 'जय अहिल्या'च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.
 पोलिसांचा चोख बंदोबस्त व सन्मान  
या कार्यक्रमासाठी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक  आप्पासाहेब  हंडाळ, पोलीस हवालदार किरण शिंदे, पो. कॉ. प्रवीण कांबळे, गणेश इथापे, श्री  सुशांत होलगिर, आजिनाथ आंधळे  तसेच गृहरक्षक दलाचे राजेन्द्र देसाई, चंद्रकांत मोरकर, मनोज जगताप, प्रमोद भोसले आदीनी चोख बंदोबस्त बजावला  यावेळी  मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते. 
जयंती उत्सव समितीच्या वतीने सर्व मान्यवरांसह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शाल-श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
उत्सव यशस्वीतेसाठी परिश्रम  
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निपाणी वडगाव येथील समाज बांधव, लोकमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती व ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी उत्सव समितीच्या वतीने अध्यक्ष श्री नाना  राऊत यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमास महिला, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निपाणी  वडगाव येथे अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागी ग्रामस्थ व ढोल-ताशा पथक. बाजूला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करताना उत्सव समितीचे पदाधिकारी.
-
close