"अहद तंजावर ते तहद पेशावर, अटक ते कटक" अवघा मुलुख आपला अशी मराठा साम्राज्याची ओळख आणि ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे या सर्वच प्रांतातून संरक्षणाच्या बदल्यात चौथ(कर) वसुली मराठे करत, तत्कालीन मराठा प्रांतातील विर योद्धे अखंड हिंदुस्थानच्या रक्षणासाठी लढले, मराठ्यांनी गादीवर बसण्यासाठी लढा दिला नाही तर, युद्ध जिंकल्यानंतर गादीवर कोण बसणार हे ठरवणारे मराठे होते. पानिपत लढाईत इतर कोणत्याही प्रांतातून मदत मिळालीच नाही याउलट फितुरीचा सामना करत अक्षरशः अन्नधान्य संपल्यानंतर उपाशीपोटी अहमदशहा अब्दालीच्या फौजेविरुद्ध शेवटच्या श्वासापर्यंत लढले. यमुना तिरावर मराठ्यांच्या रक्ताचे पाट राष्ट्र रक्षणासाठी वाहिले.
अब्दालीचे पुन्हा हिंदुस्थानकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस झाले नाही. मराठी मातीतील असंख्य विर योद्ध्यांच्या पराक्रमाची साक्ष म्हणजे "मराठा साम्राज्य". आपण इतिहास अभ्यासक्रमात शिकवण्यात कमी पडतोय अशी खंत तसेच मराठा साम्राज्याचा नकाशा सिबीएसईने अभ्यासक्रमात समाविष्ट करावा अन्यथा महाराष्ट्रातून सिबीएसईलाच हद्दपार करावे लागेल, असा इशारा शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष राहुल ढेंबरे पाटील यांनी दिला आहे.

