shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भावभावनांचे प्रतिबिंब अंतरी : माधुरीताई मरकड

अहिल्यानगर(प्रतिनिधी)  - मनातील विविध भावभावनांचे प्रतिबिंब उमटवणाऱ्या कवितांचा समावेश अंतरी मध्ये असून शब्दगंध ने अनेक नवोदितांना  उजेडात आणण्याचे काम केले आहे, सुरेखा घोलप या कार्यकर्त्या कवयित्री असल्याने त्यांच्या मनाची प्रतिबिंब यात म्हटले आहे, असे प्रतिपादन कवयित्री माधुरी मरकड यांनी केले.

        शिक्षिका, वृत्त निवेदिका, कवयित्री सुरेखा घोलप लिखित "अंतरी' काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच १७ व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनात कवी कट्टा अंतर्गत दिमाखदार सोहळ्यात त्यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी त्या बोलत  होत्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,अंतरीचा ठाव घेणाऱ्या, सुख-दुःख व्यक्त करणाऱ्या कविता आणि सकारात्मकतेने जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असणारी कवयित्री त्यामुळे हा काव्यसंग्रह नक्कीच वाचनीय आहे. 
    यावेळी विचारमंचावर जेष्ठ कवी चंद्रकांत पालवे, प्रा. चंद्रकांत भोसले, प्रा.शशिकांत शिंदे, प्रकाशक सुनील गोसावी,अध्यक्ष राजेंद्र उदागे, ज्ञानदेव पांडुळे, सुभाष सोनवणे, कवयित्री शर्मिला गोसावी,स्वाती ठुबे, ॲड. अनुराधा येवले उपस्थित होते.  
     उत्कृष्ट मराठी अध्यापना बरोबरच, नाट्यलेखन, दिग्दर्शन, अभिनय, समिक्षात्मक लेखन, वृत्त निवेदिका, सूत्रसंचालक आणि शब्दगंधची धडपडणारी कार्यकर्ती म्हणून सुरेखा घोलप यांच्या पहिल्याच '' अंतरी " या काव्यसंग्रहाला कवयित्री शर्मिला गोसावी यांनी शुभेच्छा दिल्या. या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ चित्रकार प्रशांत सुर्यवंशी यांनी केले असून काव्यरेखाटने चित्रकार दिलीप शहापूरकर यांची आहेत. 
   याप्रसंगी शब्दगंध ची महिला टीम मुख्याध्यापिका वर्षा भोईटे, जयश्री झरेकर, सुजाता पुरी, ऋता ठाकूर, शर्मिला रणधीर, आरती गिरी, संगिता गिरी, स्वाती अहिरे, शामा मंडलिक, उमादेवी राऊत, कल्पना तुपे,
प्रा. माणिकराव विधाते, पंढरपूरचे बापू तोंडले पाटील, डॉ.अशोक कानडे,स्वाती राजेभोसले, डॉ. रमेश वाघमारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
close