shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडार समाजातील अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

जयसिंगपूर (प्रतिनिधी) : वडार समाजातील अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव असा प्रेरणादायी कार्यक्रम जयसिंगपूर येथे उत्साहात पार पडला.

क्रांतिवीर उस्ताद लहुजी साळवी सेवाभावी संस्थेच्या वतीने आणि आयोजक श्री. सचिन मनोहर भोसले यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र वडार विद्यार्थी गौरव समितीच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावी व बारावी परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. सुनील चव्हाण सर होते. यावेळी जयसिंगपूरच्या उपनगराध्यक्षा सौ. अनुराधा आडके, जिल्हाध्यक्ष श्री. अर्जुन देशमुख, नगरसेवक महेश कलकुटगी, नगरसेविका गीता भोसले, नगरसेविका स्वाती मादनाईक, वडार मजूर शिल्प संघाचे अध्यक्ष शामराव विटकर, विष्णू चौगुले (सोलापूर), निळू शिंगाडे, नितीन साळुंखे, सुरेश शिंगाडे, बाळकृष्ण पवार सर, अमोल वडार, सुभाष पवार, परशु शिंगाडे, राजू जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच दहावी व बारावी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्यात आले. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व समाजोपयोगी कार्य करणाऱ्या व्यक्तींनाही पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

समाजातील शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि गुणवंतांचा गौरव या त्रिसूत्रीवर आधारित हा उपक्रम वडार समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले.

close