इंदापूर तालुक्यातील तरुणांमध्ये प्रवीण माने यांच्या विषयी पुढच्या भविष्याचे आशादायक चित्र - किशोर माने.
इंदापूर - वडापूरी: इंदापूर तालुक्यातील तरुणांमध्ये प्रवीण भैय्या माने यांच्या विषयी आकर्षण किंवा पुढच्या भविष्याचे आशादायक अशा प्रकारचे चित्र आहे. त्या आशेला भैय्या शंभर टक्के न्याय देतील असे आशादायक मत भाजप नेते प्रवीण माने यांच्या वाढदिवसानिमित्त वडापुरी येथे श्रीनाथ विद्यालय वडापुरी मध्ये आयोजित करण्यात आलेल्या शालेय विद्यार्थ्यांना मोफत वही वाटप कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सोनाई ग्रुपचे संचालक किशोर माने यांनी केले.
यावेळी भाजपचे पूर्वमंडल अध्यक्ष राम असबे, ऑडिटर हरिदास माने, मा. पं. स. सदस्य बापूसाहेब चंदनशिवे, मा. उपसरपंच महेश देशमुख, प्रीतमकुमार देवकर, मा. ग्रा सदस्य विट्टल कदम, संतोष देशमुख, गणेश पिसाळ, अभिजित चव्हाण, श्रीनाथ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पवार मॅडम, जि प. प्रा. शाळेचे मोहिते सर इतर शिक्षक स्टाफ व विद्यार्थी उपस्थितीत होते.
वडापुरी (ता इंदापूर ) येथील जिल्हा परिषद शाळा वडापुरी,मळशी, रामवाडी, तोबरेवस्ती आणि श्रीनाथ विद्यालय वडापुरी या शाळेतील विद्यार्थ्यांना भाजप नेते प्रविण माने यांच्या वाढीवसानिमित्त मोफत वही वाटप सोनाई ग्रुपचे संचालक किशोर माने यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच पुढे बोलताना किशोर माने म्हणाले की,गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून प्रवीण माने यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक विधायक काम होते आहे. प्रवीण भैयांचे मत आहे की, वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमातून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, रुग्णांसाठी रक्तदान शिबिरातून रक्त संकलन होत असते. त्या पद्धतीने याही वर्षी वाढदिवस साजरा करा . तसेच ते पुढे म्हणाले की,सोनाई दूध डेरी वडापुरीच्या हाकेच्या अंतरावर आहे. गावातील अनेक कर्मचारी व इतर लोक सोनाई ग्रुप सी जोडलेले आहेत. सोनाई चे संस्थापक अध्यक्ष दशरथ माने आणि प्रवीण माने यांचे या वडापुरी गावावर नेहमीच प्रेम असते. शाळेच्या बाबतीतील आपल्या मागण्या नसतील असेही काम प्रवीण भैय्या माने नक्कीच करतील.
याप्रसंगी बापूसाहेब चंदनशिवे यांनी मनोगत व्यक्त केले.तर
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिर्के मॅडम यांनी केले.
--------------------------
फोटो ओळ :भाजप नेते प्रवीण माने यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीनाथ विद्यालय वडापुरी विद्यार्थ्यांना मोफत वही वाटप किशोर माने यांच्या हस्ते करण्यात आले.

