अनंतराव पवार विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षा 2025-26 मध्ये घवघवीत यश.
इंदापूर : निर-निमगाव इंदापूर तालुक्यातील कै. अनंतराव पवार ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित अनंतराव पवार विद्यालय, निर-निमगाव येथील विद्यार्थ्यांनी इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
इयत्ता 8 वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेस सात विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी सर्व सात विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून कु. हर्षदा सचिन गरगडे हिने 300 पैकी 224 गुण मिळवून शिष्यवृत्तीस पात्र ठरत विद्यालयाच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे.
तसेच इयत्ता 5 वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेस आठ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी सहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून कु. आर्या बापूराव देवडे हिने 300 पैकी 248 गुण आणि कु. वेदिका निलेश गरगडे हिने 300 पैकी 236 गुण मिळवून शिष्यवृत्तीस पात्र ठरल्या आहेत.
त्यांना मार्गदर्शन श्रीमती .मकर व्ही. व्ही., मुलाणी एस .एम., श्रीमती.घोगरे ए.डी. डोळे ए.एस., गोरे ए.पी. , मोरे .ए.व्ही. विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक गरगडे बी. जे. तसेच विद्यालयाचे नूतन मुख्याध्यापक मोरे बी. एम. यांनी सर्व विध्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष दत्ताजीराव घोगरे, उपाध्यक्ष रणजित घोगरे, सचिव अजित घोगरे, संस्थेचे इतर संचालक तसेच लाखेवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख संदीप पवार तसेच पालक व ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
-------------------------
फोटो ओळ: अनंतराव पवार विद्यालय, निर-निमगाव येथील विद्यार्थ्यांनी इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल सत्कार करताना विद्यार्थी व शिक्षक.

