अभिनव राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामवाडीचे यश.
कु.अनुश्री जगताप (इ. १ ली) हिनेमिळवला राज्यात दुसरा क्रमांक.
इंदापूर : अभिनव राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा 2026 स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रामवाडी (वडापुरी) येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. यामध्ये कु.अनुश्री अजित जगताप
(इ. १ ली) हिने राज्यात द्वितीय क्रमांक मिळवून शाळेचा आणि परिसराचा गौरव वाढविला. तसेच सिद्धार्थ सचिन पवार (इ.3 री) याने केंद्रात 3 रा येण्याचा मान मिळविला. त्याबरोबरच
इ.२री तील आराध्या किशोर रेडेकर, सानवी संदीप काळे, सत्यम अतुल चव्हाण, स्वराली शिवप्रसाद पवार, ऋतुराज निलेश गेंड.
इ.३ री तील श्रेया सतीश काळे, प्राजक्ता संतोष काळे , इ.४ थी तील प्रतीक विश्वनाथ पवार, शिवम अतुल चव्हाण, शिवहर्ष अण्णासो फडतरे, शिवचरण दिग्विजय फडतरे, समृद्धी शिवप्रसाद पवार,
यांनी यश संपादन केले आहे.
या विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांची मेहनत, पालकांचे प्रोत्साहन तसेच शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. या यशाबद्दल पालक, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.
या यशामुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांनाही स्पर्धा परीक्षांची प्रेरणा मिळाली असून भविष्यातही अशीच उज्ज्वल कामगिरी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
-------------------------------
फोटो ओळ: अभिनव राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामवाडीच्या कु.अनुश्री अजित जगताप सन्मान करताना मान्यवर.

