shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात 26 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया; जनआरोग्य योजनेंतर्गत शिबिर संपन्न

मोर्शी, दि. 5 जुलै : महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत जनआरोग्य योजनेअंतर्गत उपजिल्हा रुग्णालय, मोर्शी येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष शस्त्रक्रिया शिबिरात तब्बल 26 रुग्णांवर यशस्वी सामान्य शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

या शिबिरामध्ये हर्निया, हायड्रोसिल, अंबिलिकल हर्निया, अपेंडिक्स तसेच इतर विविध आजारांवरील शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सर्व शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्याने परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या शिबिरासाठी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार, सर्जन डॉ. प्रवीण बिजवे, डॉ. राहुल खन्ना तसेच भुलतज्ज्ञ डॉ. जगदीश काळभोर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

सदर शिबिराचे आयोजन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार आणि निवासी बाह्य संपर्क अधिकारी डॉ. संदीप हेडाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी उपजिल्हा रुग्णालय, मोर्शी येथील वैद्यकीय समन्वयक डॉ. घनश्याम मानकर, डॉ. अर्जुन पोतदार, डॉ. प्रेरणा वानखडे, डॉ. कापसे, वर्षा दारोकर, श्रीमती रेशमा बहुरूपी, प्रतीक्षा पांचाळे, मीनाक्षी मेश्राम, सोनाली डिकोंडवर, अंकित नेवारे, स्मिता पकडे, सागर झटाले, प्रवीण कापडे, शोभा इंगळे, संगिता तायवाडे, कमला तायवाडे तसेच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत जनआरोग्य योजनेतील वसीम शेख आणि प्रकाश पांडे यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

या शस्त्रक्रिया शिबिरामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोफत आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध झाली असून, या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


close