इंदापूर :प्रतिनिधी दि.6/7/26
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते इंडियन मेडिकल असोसिएशन इंदापूर शाखेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा इंदापूर येथे भाग्यश्री बंगलो येथे शुक्रवारी सन्मान करण्यात आला.
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. अभिजित ठोंबरे व नवनिर्वाचित कार्यकारिणी सदस्यांचा सन्मान करीत हर्षवर्धन पाटील यांनी विधान गाथा हे पुस्तक भेट दिले. याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा व्यक्त केल्या.
नवनियुक्त अध्यक्ष डॉ. अभिजित ठोंबरे यांनी बोलताना सांगितले की, 'आयएमए'च्या माध्यमातून तालुक्यामध्ये सामाजिक उपक्रम आणि मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाईल.
यावेळी आयएमएचे नूतन संचालक मंडळ तसेच डॉ.अविनाश पाणबुडे, डॉ. संजय शहा, डॉ.राजेंद्र शिंदे, डॉ. मिलिंद खाडे, डॉ.लक्ष्मण सपकळ, डॉ.अर्जुन नरुटे यांचेसह तालुक्यातील मान्यवर डॉक्टर उपस्थित होते.
•नवनिर्वाचित पदाधिकारी (2027-27):-
अध्यक्ष: डॉ. अभिजीत ठोंबरे
पुढील वर्षाच्या अध्यक्षा:
डॉ. शुभांगी शिंदे
उपाध्यक्ष: डॉ. शिवाजीराव खबाले व डॉ.ऋषिकेश गार्डे
सचिव: डॉ. अतुल वणवे
सहसचिव: डॉ. सचिन बिचुकले
खजिनदार: डॉ. महेश रुपनवर
आयएमए महिला डॉक्टर विंग:
अध्यक्षा: डॉ. कल्पना खाडे
समिती सदस्य: डॉ. सविता पोमणे-चित्रकोटी, डॉ. कोमल गार्डे
विविध समित्यांचे प्रमुख:
शैक्षणिक आणि वैज्ञानिक विभाग: डॉ. रोहित कांडलकर
क्रीडा समिती: डॉ. सागर दोशी
सांस्कृतिक समिती: डॉ. रोहिदास थोरवे, डॉ. नुपूर कदम
सोशल मीडिया आणि जनसंपर्क समिती: डॉ. अमोल रासकर
आयएमए प्रकल्प समिती: डॉ. अमोल खनावरे
वैद्यकीय-कायदेशीर समिती: डॉ. नितीन लोंढे.
•चौकट:-
ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक बळकट व्हावी-हर्षवर्धन पाटील
---------------------------------------- इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळवून देण्यामध्ये 'आयएमए'ची भूमिका सातत्याने महत्त्वाची राहिलेली आहे. नूतन कार्यकारिणी देखील हाच सामाजिक वसा पुढे नेईल, असा विश्वास व्यक्त करून ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक बळकट होण्याची गरज याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.
____________________________
फोटो:-इंदापूर येथे 'आयएमए'च्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार प्रसंगी हर्षवर्धन पाटील.

