shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सामाजिक कार्याची दखल; दीपक कदम यांना 'ज्ञानदीप गौरव' व 'जिजाऊ कर्तृत्व गौरव पुरस्कार २०२६ प्रदान


*शिवराज्याभिषेक दिनानिमित्त स्वराज्य प्रतिष्ठानकडून प्रतिष्ठेचा सन्मान

शौकतभाई शेख/ श्रीरामपूर:
सामाजिक, शैक्षणिक व जनहिताच्या विविध उपक्रमांमधील उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष दीपक कदम यांना 'छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानदीप गौरव' तसेच 'राजमाता माँसाहेब जिजाऊ कर्तृत्व गौरव पुरस्कार २०२६' प्रदान करून गौरविण्यात आले.

स्वराज्यातून सुराज्याच्या नवनिर्माणाचे अधिष्ठान या संकल्पनेअंतर्गत स्वराज्य प्रतिष्ठान, शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट आणि हुतात्मा बाळू गेणू स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद आप्पा पाटील होते. उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक (आयपीएस) डॉ. सुधाकर सुराडकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री ज्योतीताई ठाकरे, संभाजीराजे जाधवराव, अभिनेत्री व मॉडेल पियू चौहान, मंगला परब, दिप्ती (प्रेरणा) गायकर, दिलीप नारद, सुभाषराव गायकवाड, सुरेश साळवी, संगिताताई गुरव, अनिताताई काळे, सुरज भोईर, डॉ. प्रभाकर कांबळे, ॲड. सोपान बुडबारकर, गिरीश शाह, महेश कोकाटे, अनिल साळवे, मीनाक्षी आहिरे, वैशाली कांबळे, विजय भोसले, डॉ. संजय हर्षे, भारत खांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारल्यानंतर दीपक कदम यांनी हा सन्मान समाजकार्यात अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा देणारा असल्याची भावना व्यक्त केली. तसेच स्वराज्य प्रतिष्ठान, शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट, हुतात्मा बाळू गेणू स्मारक समिती, मैत्री संस्था, सामाजिक कार्यकर्ते समन्वय समिती आणि मुंबई मित्र संघटना यांचे मनःपूर्वक आभार मानले.

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष दीपक कदम यांना 'छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानदीप गौरव' व 'राजमाता माँसाहेब जिजाऊ कर्तृत्व गौरव पुरस्कार २०२६' प्रदान करताना उपस्थित मान्यवर.

वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
close