*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काळेवाडी नं. १ येथे गुरुपौर्णिमेनिमित्त संस्कारमूल्यांचा उपक्रम*
काळेवाडी : गुरुपौर्णिमेच्या पावन निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काळेवाडी नं. १ येथे विद्यार्थ्यांमध्ये कृतज्ञता, आदर आणि संस्कार रुजविण्याच्या उद्देशाने "आपल्या आई-वडिलांचे चरणपूजन करून आशीर्वाद घेणे" हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी शाळेत आई-वडिलांचे चरणस्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेतला. या भावनिक आणि संस्कारक्षम
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आई-वडिलांविषयी आदर, कृतज्ञता, प्रेम, आज्ञाधारकपणा आणि कौटुंबिक मूल्यांची जाणीव अधिक दृढ झाली. पालकांनीही या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत मुलांच्या संस्कारक्षम जडणघडणीसाठी शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये आणि भारतीय संस्कृतीची जपणूक व्हावी, या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काळेवाडी नं. १ विविध उपक्रम सातत्याने राबवत असून गुरुपौर्णिमेचा हा उपक्रम त्यापैकीच एक प्रेरणादायी उपक्रम ठरला.या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक प्रताप शिरसट व उपक्रमशील शिक्षिका कांचन रणपिसे मॅडम यांनी केले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपअध्यक्ष , सदस व पालक यांनी या उपक्रमाचे कौतुक करुन विद्यार्थी सर्व गुणसंपन्न घडवण्याची क्षमता जिल्हा परिषद शाळेतच असल्याचे सांगितले

