🌹🌹 ॐ साई राम 🌹🌹
अहंकार सोड रे मानवा, साईनामाचा ध्यास धर,
कर्म तुझेच ओळख ठरेल, प्रेमाने जीवन सुंदर कर॥
१
आज तुझा हा वैभव सारा, उद्या क्षणात दूर जाई,
काळाच्या या चक्रामध्ये, सत्ता-शक्ती कुणा न राही.
रिकाम्या हाती आलास जगती, रिकाम्या हाती जाशील,
सत्कर्मांच्या सुवासामधुनी, अमर जगात तू राहशील॥
२
सिकंदरही गेला रिकामा, जिंकुनी अवघे विश्व सारे,
हात पसरुनी सांगून गेला, धन न येई सोबती रे.
साई म्हणती प्रेम पेर रे, दयेची फुले उमलू दे,
कर्मरूपी दीप उजळुनी, जीवनमार्ग प्रकाशित होऊ दे॥
३
सुख-दुःखाचे पाण्यासारखे, क्षण ओंजळीत येती जाती,
क्षणाक्षणाला अर्थ दे रे, हाच खरी जीवनगाथा होती.
'आजच कर' हा मंत्र जपूनी, वेळेचे सोने करून घे,
उद्यावरती ढकलू नको रे, स्वप्नांना आजच पंख दे॥
४
लोभ-मोहाचे बंध तोडुनी, सत्याचा मार्ग धरावा,
प्रेम, दया, सेवा, करुणेने, प्रत्येक श्वास फुलवावा.
साईचरणी मस्तक ठेवू, अहंकार सारे विसरू,
कर्म हाच खरा धर्म समजुनी, मानवतेचा दीप धरू॥
साईनामाचा गजर करू या, प्रेमसुरांनी जग भरू,
सत्कर्मांच्या पवित्र वाटेवर, आनंदाने पुढे सरू.
जन्म मिळाला मानवाचा, त्याचा खरा मान राखू,
"कर्म हिच ओळख, साईच स्मरण" म्हणत जीवन धन्य करू॥
प्रस्तुती:शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह म्युझिक टिम अहिल्यानगर
गितकार: रमेश जेठे सर जिल्हा अहिल्यानगर
🌹🙏 ॐ साई राम..... 🙏🌹

