shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीरामपूर नगरपालिकेचे वसंतराव देशमुख पत्रकारिता पुरस्कार जाहीर

शौकतभाई शेख / श्रीरामपूर :
श्रीरामपूर नगरपालिकेच्या वतीने दिले जाणारे ज्येष्ठ संपादक वसंतराव देशमुख जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाले आहेत. ज्येष्ठ पत्रकार महादेव कुलकर्णी यांना जीवनगौरव, तर मुख्य पुरस्कार अशोक निंबाळकर यावेळी सन्मानित केले जाणार आहे.

             पालिकेच्या वतीने दरवर्षी हे पुरस्कार प्रदान केले जातात. पालिकेच्या गोविंदराव आदिक सभागृहात गुरुवार दि.३० जुलै २०२६ रोजी संध्याकाळी ४ वाजता हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे माजी मंत्री जयंत पाटील आणि माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राहणार आहे, तर दैनिक लोकमतचे राजकीय संपादक यदु जोशी यांचे यावेळी व्याख्यान होणार आहे.

 
आमदार हेमंत ओगले, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, उद्योजक विक्रम सारडा, नगराध्यक्ष करण ससाणे, उपनगराध्यक्ष कांचन सानप, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन गुजर, मुख्याधिकारी मनोज उक्रिडे, शिक्षण मंडळाचे सभापती राजेंद्र पवार, बाबासाहेब दिघे, ज्ञानेश्वर मुरकुटे, सभापती सुधीर नवले यावेळी उपस्थित राहणार आहेत.
             अन्य पुरस्कारार्थींमध्ये रियाज देशमुख, मच्छिंद्र देशमुख, दादासाहेब म्हस्के, दिलीप खरात, नीलिमा घाडगे यांचा समावेश आहे. पुरस्काराचे हे १४ वे वर्ष आहे. नगरपालिकेच्या अर्थसंकल्पात ३ लाख रुपयांची पुरस्कारासाठी तरतूद करण्यात आली आहे. अशी तरतूद करणारी राज्यातील ही एकमेव नगरपालिका आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी, सर्व नगरसेवक नगरसेविका तसेच श्रीरामपूर पत्रकार संघ व प्रेस क्लबने केले आहे.

*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
close