मोर्शी:-
मोशी येथील लाहोटी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तसेच आजही तरुणांना लाजवेल अशी एक उर्जाशक्ती असलेले श्री दिलीप सिंह खांबरे सर सतत सामाजिक बांधिलकी म्हणून काम करीत आहेत.
मग ते डॉ गोविंद कासट यांच्या माध्यमातून असो किंवा जेष्ठ नागरिक मंडळ यांच्या माध्यमातून ते काम करीत आहेत.प्रामुख्याने मी जेव्हा विदर्भ साहित्य संघाच्या कार्यकारिणी सदस्य म्हणून निवडणूकीत एक उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले होते.तेव्हा मला त्यांनी एक समाजातील व्यक्ती म्हणून सहकार्य केले आहे हे मात्र खरे आहे.
मी कधीच कोणत्याही प्रकारे जात धर्म पंथ यामध्ये अडकलो नाही.माझे वैयक्तिक पातळीवर संबंध सर्वांसोबत सारखेच आहेत.
खांबरे सर हे मोशी येथील नगर परिषद येथे निवडून आलेले माजी नगरसेवक आहेत.तसेच ते उत्तम क्रिकेट या माध्यमातून संचालक करीत होते.
आमचे स्नेही असलेले श्री मुन्ना मालवीय हे नेहमीच त्याच्या बाबतीत सांगत असतात.आजही हा माणूस एक सामाजिक बांधिलकी म्हणून आणि माणूसकी जोपासत हसत हसत अनेक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक चळवळीत काम करीत आहे.
अमरावती विद्यापीठाच्या माध्यमातून अनेक वर्षे ते अनेक समित्यांवर सदस्य म्हणून काम केले आहे.
मला आठवतंय की अजुनही
आपण देवानंद यालाच सदाबहार अभिनेता समजतो.
मला वाटते की ते आजही त्या देवानंद याला लाजवेल या जोमाने काम करीत आहेत.
मग ते महाराणा प्रतापसिंह जयती असो किंवा एखादी व्याख्यानमाला असो सातत्याने भाग घेतात
आज २८ जुलै रोजी त्यांना मी एक साहित्यिक म्हणून तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून
आणि एक समाज बांधव या नात्याने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो.
कारण एक उर्दू शायर असे म्हणतोय की,
हम झुकते है
क्यो की हमे
रिश्ते निभाने का शौक है
वर्णा हम गलत
कलभी नहीं थे
और आज भी नहीं है!
प्रसिद्धी करीता धावाधाव करणारी माणसं आज समाजात वावरताना दिसतात
मला वाटते की कोणताही माणूस केवळ एक प्रसिद्धी यामुळे कधीच मोठा होत नसतो.
आपले कर्म हेच नेहमी यश पांघरूण जात असतं ते खरे आहे.आपले पाय नेहमी जमीनीवर असले पाहिजे?
खांबरे सर हे जमीनीवर पाय असणारे एक माणूसपण सांभाळून जीवन जगत आहे हे मात्र खरे आहे.
कारण
शोहरत की बुलंदी भी एक दिन
का तमाशा है
जीस शाख पे
बैठे हो
वह कभीभी टुट सकती है!
त्यामुळे आपण कसे जगायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा व्यक्त करतो आहे सर
विष्णू सोळंके
७०२०३००८२४

