shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, शिर्डी येथे आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडी उत्साहात



शिर्डी प्रतिनिधी : ( तुषार महाजन )
आषाढी एकादशीचे औचित्य साधून साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, शिर्डी यांच्या वतीने शाळेपासून श्री साईबाबा मंदिरापर्यंत पारंपरिक पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या परिसरात पालखी पूजनाने झाली. संस्थेचे संस्थापक माननीय श्री तानाजी गोंदकर सर व स्कूल च्या प्रिन्सिपॉल माननीय मंगला कुऱ्हे मॅडम व शिक्षकवृंद यांच्या हस्ते पालखीचे विधिवत पूजन करून टाळ-मृदुंग, विठ्ठल नामाचा गजर आणि भक्तिमय वातावरणात दिंडीचे प्रस्थान झाले.
शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने पालक या दिंडीत सहभागी झाले होते. दिंडी श्री साईबाबा मंदिर परिसरात पोहोचल्यानंतर मंदिराजवळ पारंपरिक खेळी रिंगण सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यामुळे वारकरी परंपरेचे दर्शन घडले आणि उपस्थितांमध्ये भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले.
यानंतर सर्व शिक्षक, पालक आणि सहभागी विद्यार्थ्यांनी श्री साईबाबांच्या समाधी मंदिरात जाऊन दर्शन घेतले व सर्वांच्या सुख-समृद्धी, आरोग्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली.
दर्शनानंतर दिंडीचे प्रस्थान पुन्हा शाळेकडे झाले. संपूर्ण मार्गावर विठ्ठल नामाचा अखंड गजर, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि विद्यार्थ्यांचा उत्साह यामुळे परिसर भक्तिमय झाला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची परंपरा, भारतीय संस्कृती आणि भक्तीभाव यांची ओळख करून देण्याचा उद्देश यशस्वीपणे साध्य झाला.
या दिंडी सोहळ्याचे पालक व नागरिकांनीही कौतुक केले.
close