shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे इन्फ्रा मुख्यमंत्री आहेत - भाजप नेते प्रवीण माने.इंदापूर येथे भाजप नेते प्रवीण माने यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे इन्फ्रा मुख्यमंत्री आहेत - भाजप नेते प्रवीण माने.
इंदापूर येथे भाजप नेते प्रवीण माने यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
इंदापूर: सामाजिक गोष्टीसाठी या  मोठा पाठिंबा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा असतो.  महाराष्ट्र राज्यांमध्ये किती गतीन या देशांमध्ये आपल्या महाराष्ट्राचा विकास या ठिकाणी सुरू आहे.  कनेक्टिंग लिंक जी कोणच म्हणत नव्हतं की ती होऊ शकतं पण आज 45 मिनिटाचा वेळ या लिंकमुळे वाचला हे बनवण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जा वापरून कनेक्टिंग लिंक सुरू झाला . हडपसर ते यवत सहा पदरी रस्त्याचे सुरुवात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते झाले. या रस्त्यामुळे हडपसर ते यवत 28 मिनिटांचा कालावधी लागू शकतो. माझे मत असे आहे की, ते फक्त मुख्यमंत्री नाहीत तर ते इन्फ्रा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे आहेत. त्यांनी आज पर्यंत विकास कामाची खूप मोठी घोडदौड केलेली आहे. असे उद्गार भाजप नेते प्रवीण माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर पालखी स्थळ येथे वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी काढले. 

यावेळी या वृक्षारोपण कार्यक्रमास युवा नेते प्रविण माने, माऊली वणवे, भारतीय जनता पार्टी इंदापूर शहर अध्यक्ष किरण गानबोटे, राजकुमार जठार, तेजस देवकाते, राम आसबे, इंदापूर नगर परिषद विरोधी पक्षनेते  अनिल पवार, अतुल शेटे पाटील, वसिम बागवान, संजय शिंदे, अभिजित घोगरे, ॲड. मयूर शिंदे, सचिन शिरसट, लखन जगताप, नागेश गायकवाड, हर्षवर्धन कांबळे, मनोज साबळे, पांडुरंग व्यवहारे, श्रीनिवास सातपुते तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि वृक्षप्रेमी सामाजिक संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच प्रवीण माने पुढे म्हणाले की, इंदापूर शहरांमध्ये महाराष्ट्र राज्याचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस  यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर शहरामध्ये हे पालखी मैदान आहे या ठिकाणी 101 वृक्षाच्या लागवडीच्या कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आहे. ज्या झाडापासून ऑक्सिजन भरपूर मिळेल अशी झाडे भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुका यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आला. वृक्षप्रेमी सामाजिक संस्था भागवत घनवट, अरुण गार्डे, सुनील नरुटे, अनिल निकम, फुलचंद मुंडे, भारत गायकवाड ,धरमचंद लोढा या व अनेक वृक्षप्रेमी सामाजिक संस्थेबरोबर जोडलेली नागरिक येथे झाडांचे संगोपन करणारे आहेत. त्याबद्दल वृक्षप्रेमी सामाजिक संस्थेचे मी मनापासून आभार मानतो. ते झाड वाचवतात, झाड जगवतात, आपल्याला चांगले ऑक्सिजन मिळवण्यासाठी ते प्रयत्न करतात.

आम्ही सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा देतो आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीने येणाऱ्या रविवारी सकाळी दहा वाजता राधाइं मंगल कार्यालयात या ठिकाणी रक्तदान शिबिर  आयोजित केलेला आहे. त्या रक्तदान शिबिरासाठी आपल्या या तालुक्यांमध्ये या परिसरामध्ये अनेक नागरिकांना रक्त तुटवडा जाणवत असते त्या संदर्भात आम्हा कार्यकर्त्यांना सांगितलं जात होते या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व समाधान शिबिर राज्य शासन व महसूल खात्याच्या वतीने या इंदापूर तालुक्यात राबवले जाणार आहे. असे विविध सामाजिक उपक्रम भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुका हाती घेत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 56 वा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. 

तसेच आज महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय जी अजितदादा पवार यांची आज जयंती आहे. अतिशय  चटका लावून देणारी घटना यावर्षी घडली. अजित दादांचे सामाजिक काम अतिशय मोठे होते .भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुक्याच्या वतीने मी आदरणीय अजितदादांना भावपूर्ण अशी आदरांजली या ठिकाणी अर्पण करतो.
-------------------------------
 **महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या* *वाढदिवसानिमित्त शुभेच्छा- इंदापूर नगर परिषदेचे विरोधी पक्ष नेते अनिल पवार.* 
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या वाढदिवसानिमित्त आज पालखी स्थळावरती वृक्षप्रेमी सामाजिक संस्था यांना बरोबर घेऊन भाजप नेते प्रदीप गारटकर, युवा नेतृत्व प्रवीण माने यांच्या माध्यमातून वृक्षारोपण केले आहे. त्यानिमित्त वृक्षप्रेमींचे मी सर्वांचे आभार मानतो व स्वागत करतो. त्यांनी आम्हाला साथ दिली आणि मी सर्वांच्या वतीने  देवेंद्र फडणीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो . - इंदापूर नगर परिषद विरोधी पक्ष नेते अनिल पवार.
--------------------------
 *महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे रचनात्मक कामावरती विश्वास ठेवतात- किरण गानबोटे* 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे रचनात्मक कामावरती विश्वास ठेवतात त्याचा पोस्टरबाजी वरती विश्वास नाही त्यामुळे हा सामाजिक उपक्रम प्रदीप गारडकर व प्रवीण माने  यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना शुभेच्छा पर आयोजित केलेला आहे.- भाजपचे अध्यक्ष किरण गानबोटे.
------------------------------
close