shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लाभार्थींनी अपूर्ण घरकुल पूर्ण करून घ्यावे- पंचायत समिती सदस्या अर्चना खबाले.

लाभार्थींनी अपूर्ण घरकुल  पूर्ण करून घ्यावे- पंचायत समिती सदस्या अर्चना खबाले.
इंदापूर :  वडापुरी गणातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांनी लाभार्थीनिहाय प्रत्यक्ष गावभेटी करून तांत्रिक अडचणी समजून घेऊन निरसन करून द्यावे  व लाभार्थींनी अपूर्ण घरकुल  पूर्ण करून घ्यावे, काही अडचणी असल्यास तात्काळ संबंधित ग्रामसेवक व गट विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आपल्या अडचणी सोडवाव्यात असे आवाहन इंदापूर पंचायत समिती वडापुरी गणाच्या सदस्या अर्चना खबाले यांनी वडापूरी येथील अपूर्ण घरकुल मेळाव्याच्या अध्यक्ष असताना संबंधित लाभार्थ्यांना आवाहन केले.
इंदापूर तालुक्यातील अपूर्ण घरकुल प्रकरणे मार्गी लावण्यासाठी पंचायत समिती इंदापूर अंतर्गत गण वडापुरी येथे अपूर्ण घरकुल लाभार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. 

या गणातील मेळाव्यात एकूण 9 ग्रामपंचायतचे लाभार्थी उपस्थित होते. तसेच सबंधित गावांचे सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी देखील उपस्थित होते.

तसेच विस्तार अधिकारी तुषार गवारी यांनी उपस्थित लाभार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना व इतर घरकुल योजनांअंतर्गत मंजूर घरे वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. यावेळी ग्रामपंचायतनिहाय उपस्थित अपूर्ण घरकुल लाभार्थी यांनी पहिला हप्ता घेतल्यानंतरही बांधकाम सुरू न करणाऱ्या तसेच अपूर्ण घरकुल ठेवणाऱ्या लाभार्थ्यांनी वेळेत काम केले नाही तर  वरिष्ठ पातळीवरून गरज पडल्यास मंजुरी रद्द करून निधी वसुलीची कार्यवाही केली जाईल याबाबत माहिती दिली तसेच, लाभार्थ्यांनी बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर  प्रगती दाखवून हप्ते वेळेत मिळवावेत, तांत्रिक अडचणी असल्यास ग्रामसेवक व अभियंता यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले.

 

 अपूर्ण घरकुल लवकर पूर्ण करण्यासाठी पंचायत समितीमार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती यावेळी ग्रामपंचायत अधिकारी  दादासाहेब वाघ यांनी दिली.

यावेळी पंचायत समिती सदस्या अर्चना खबाले, माजी सरपंच अजित खबाले, माजी सरपंच अस्मा मुलानी, भांडगाव सरपंच प्रतिनिधी नवनाथ भोसले, सोमनाथ पवार, विस्ताराधिकारी तुषार गवारी, ग्राम विकास अधिकारी दादासाहेब वाघ, सचिन पवार, रूपाली व्यवहारे, रामेश्वर साठे, वैभव जाधवर व इतर मान्यवर उपस्थित होते.
----------------------------------------
 चौकट: 
प्रत्येक गणात थेट लाभार्थी मेळावे घेण्याचा निर्णय -
 तालुक्यात मंजूर झालेली घरकुले वेळेत पूर्ण न झाल्याने शासनाकडून नवीन घरकुलांचे उद्दिष्ट मिळण्यास विलंब होत आहे. परिणामी हजारो पात्र कुटुंबांना घरकुलासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
त्यामुळे अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने लाभार्थ्यांना अंतिम संधी दिली असून, त्यानंतर घरकुल रद्द करून, रक्कम वसुल केली जाणार आहे. - सचिन खुडे 
गटविकास अधिकारी 
पंचायत समिती इंदापूर
----------------------
फोटो ओळ: वडापुरी येथे 
गणातील मेळाव्यात एकूण 9 ग्रामपंचायतचे लाभार्थी , सबंधित गावांचे सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांच्या उपस्थितीत अपूर्ण घरकुल लाभार्थ्यांचा मेळावा संपन्न.
close