इंदापूर तालुका लिपीक संघटनेच्या अध्यक्ष पदी प्रवीण क्षीरसागर तर उपाध्यक्ष पदी वैभव नाळे यांची निवड.
इंदापूर: इंदापूर तालुका लिपीक संघटनेच्या नूतन कार्यकारिणीची नियुक्त नुकत्याच झाले असून तालुका अध्यक्षपदी प्रवीण दिलीप क्षीरसागर आणि उपाध्यक्षपदी वैभव प्रकाश नाळे यांची निवड झाली असून यांनी संघटनेच्या आगामी कार्याची दिशा स्पष्ट करत
कर्मचारी हित, प्रशासकीय समन्वय, पारदर्शकता, डिजिटल सक्षमीकरण आणि संघटनेची एकजूट या पाच प्रमुख मुद्द्यांवर संघटना काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच अध्यक्ष प्रवीण क्षीरसागर यांनी लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे सेवाविषयक प्रश्न, पदोन्नती, कालबद्ध वेतनश्रेणी, अनुकंपा तत्त्वावरील भरती आणि प्रशासनाशी समन्वय साधून प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल, असे स्पष्ट केले. कर्मचारी आणि प्रशासन यांच्यात विश्वासाचे वातावरण निर्माण करून संघटना अधिक सक्षम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
त्यानंतर उपाध्यक्ष वैभव नाळे यांनी डिजिटल युगाशी सुसंगत कामकाजासाठी ई-ऑफिस प्रशिक्षण, तंत्रज्ञान कार्यशाळा, कामाचे समन्यायी वाटप, संघटनेत आर्थिक पारदर्शकता, सदस्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे .कर्मचाऱ्यांना होणाऱ्या त्रासाविरोधात कायदेशीर मार्गदर्शन व संरक्षण देण्यावर भर दिला जाईल असे आवाहन केले.
इंदापूर तालुका लिपीक संघटनेच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा झाल्याने पदी अध्यक्ष प्रवीण दिलीप क्षीरसागर आणि उपाध्यक्ष पदी वैभव प्रकाश नाळे यांचे संघटनेतील तसेच सामाजिक शासकीय सहकाऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
--------------------------
"इंदापूर तालुक्यातील प्रत्येक लिपिक कर्मचाऱ्याच्या न्याय्य हक्कांसाठी संघटना नेहमीच ठामपणे उभी राहील. प्रशासनाशी सकारात्मक समन्वय साधत कर्मचारी हिताचे सर्व प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत." - अध्यक्ष प्रवीण क्षीरसागर.
-------------------
" **माझा अजेंडा केवळ मागण्या मांडणे हा नाही, तर आपल्या हक्कांचे संरक्षण करणे, कामाच्या ठिकाणी सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण निर्माण करणे आणि डिजिटल युगात आपल्या लिपिक वर्गाला अधिक सक्षम बनवणे हा आहे.* **आपण सर्व एकत्र येऊन प्रशासनात आपल्या* *पदाचा आदर वाढवूया."*
- *वैभव नाळे उपाध्यक्ष* .*
*

