नगर प्रतिनिधी: ( तुषार महाजन )
शिर्डी येथील युवा कार्यकर्ते श्री. लखन ज्ञानेश्वर बेलदार यांची भारतीय जनता युवा मोर्चा, अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांच्या पंक्तीतून पुढे आलेले, समर्पित पक्ष कार्यकर्ता आणि कुशल संघटक म्हणून त्यांची ओळख आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सार्वजनिक व सामाजिक क्षेत्रातील कार्याला सुरुवात करणारे लखन बेलदार यांनी विद्यार्थी चळवळीत सुमारे ४ वर्षे सक्रिय योगदान दिले. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून गेल्या आठ वर्षांपासून संघटनात्मक कार्यात ते सक्रिय आहेत.
पक्ष संघटनेत काम करताना त्यांनी बूथ संयोजक, भारतीय जनता युवा मोर्चा शहर सचिव, शहर महामंत्री,जिल्हा कार्यालयीन मंत्री अशा विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. भारतीय जनता पार्टीच्या विविध कार्यक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. पक्ष संघटनेप्रती असलेली निष्ठा, मेहनत व युवा वर्गाशी असलेला संवाद याची दखल घेत त्यांच्यावर भारतीय जनता युवा मोर्चा अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
निवडीनंतर लखन बेलदार यांनी सांगितले की, “भारतीय जनता युवा मोर्चा हा भारतीय जनता पक्षाचा स्थापनेपासूनचा अविभाज्य भाग आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी व युवा वर्गाला जोडण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करत राहणार आहे.”
या निवडीबद्दल अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री व मार्गदर्शक मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील साहेब, प्रदेश उपाध्यक्ष मा. खा. सुजय दादा विखे पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष श्री. नितीनजी दिनकर, जिल्हा उपाध्यक्ष श्री. किरणजी बोराडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. रोहित चौधरी, शिर्डी विधानसभा प्रमुख श्री. योगेश आण्णा गोंदकर, शहराध्यक्ष श्री. रवींद्र गोंदकर यांचे लखन बेलदार यांनी मनःपूर्वक आभार मानले.
त्यांच्या निवडीबद्दल पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

