shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मोठे योगदान- आ.ओगले

शौकतभाई शेख / श्रीरामपूर:
संयुक्त महाराष्ट्रच्या चळवळीत साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे मोठे योगदान होते, त्यांनी आपल्या साहित्यातून शोषितांच्या व्यथा प्रभाविपणे मांडल्याचे आमदार हेमंत ओगले यांनी म्हटले आहे. श्रीरामपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी कार्यक्रम प्रसंगी आ.ओगले बोलत होते. ते पुढे म्हणाले की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मराठी साहित्यातील लोकवाङमय कथा, नाट्य, कादंबरी, चित्रपट, गीते, पोवाडे, लावण्या, प्रवास वर्णने असे सर्वच प्रकार साहित्याच्या रूपाने महाराष्ट्रामध्ये समृद्ध केले. आपले विचार व कार्य यांच्या माध्यमातून त्यांनी लोककलेला प्रतिष्ठा मिळवून दिली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून लोकप्रबोधन, राजकीय क्रांती आणि सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी मोलाचे योगदान दिले.या प्रसंगी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 


यावेळी नगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन गुजर, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष अण्णासाहेब डावखर, पं.स.च्या माजी सभापती वंदनाताई मुरकुटे, तालुका अध्यक्ष प्रमोद भोसले, नगरसेवक दिलीप नागरे, दीपक वमने, गोपाल लिंगायत, कलीम कुरेशी, रितेश एडके, अरुण मंडलिक, अभिजीत लिफ्टे, प्रवीण कोठावळे, सनी सानप, मास्टर सरवरअली सय्यद, नवाज जहागीरदार, रावसाहेब आल्हाट, सुरेश ठुबे, अशोक जगधने, सुनील साबळे, रितेश चव्हाणके, सनी मंडलिक, रज्जाक पठाण, जाकीर सय्यद, युनूस पटेल, भगवान जाधव, संजय गोसावी, विशाल साळवे, पुंडलिक खरे, सागर दुपाटी, मायकल मुनतोडे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
close