shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूरमध्ये विद्यार्थी संघटनांचे तहसीलदारांना निवेदन* *NEET पेपरफुटीवरून केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, तर शिक्षक-भरती प्रश्नांवरही आंदोलनाचा इशारा*

*इंदापूरमध्ये विद्यार्थी संघटनांचे तहसीलदारांना निवेदन*  

*NEET पेपरफुटीवरून केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, तर शिक्षक-भरती प्रश्नांवरही आंदोलनाचा इशारा*
*इंदापूर, दि. २० जुलै :*  
इंदापूरमध्ये नगरपरिषदेपासून मोर्चा काढून विद्यार्थी व नागरिक संघटनांनी विविध मागण्यांसाठी तहसीलदार कार्यालयात निवेदन दाखल केले आहे. भारतीय स्वाभिमानी संघ , छात्र भारती आणि इंदापूर शहर नागरी संघर्ष समिती या संघटनांनी अनेक मुद्द्यांवरून केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे.

NEET पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत या संघटनांनी सरकारचा जाहीर निषेध करून  केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली.

संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे की, गेली २० दिवस सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे लोकशाही मार्गाने दिल्लीतील जंतर-मंतर येथे सत्याग्रह करत आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी उपोषण करीत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. हा हुकूमशाही व तानाशाहीचा प्रकार आहे. देशातील ४० लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाला असून याला जबाबदार कोण याचा छडा लावण्यासाठी छात्र भारती रस्त्यावर उतरणार आहे. 

जोपर्यंत राजीनामा दिला जात नाही तोपर्यंत महाराष्ट्रभर आंदोलन सुरू राहील असा इशाराही संघटनेने दिला आहे. 

शिक्षक भरती, TET आणि पोलीस भरतीच्या प्रश्नांवर नागरी संघर्ष समिती आक्रमक.
इंदापूर शहर नागरी संघर्ष समिती ने देखील तहसीलदारांना निवेदन दिले आहे. 
 कोणत्याही खाजगी कंपनीला किंवा पब्लिकेशनला स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी ठेका देऊ नये, TET ची परीक्षा घेताना सेवेत असले शिक्षक व नवीन भरतीसाठी प्रयत्नशील असलेल्या उमेदवारांच्या परीक्षा वेगवेगळ्या पद्धतीने घ्याव्यात, पोलीस भरती सातत्याने पुढे ढकलल्यामुळे वयोमर्यादेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे वयोमर्यादा ओलांडून बाद झालेल्या उमेदवारांना संधी द्यावी. अशी मागणी करण्यात आली आहे.


या वेळी भारतीय स्वाभिमानी संघाचे राष्ट्रीय महासचिव नानासाहेब चव्हाण , इंदापूर शहर नागरिक संघर्ष समितीचे कृष्णाजी ताटे, तानाजी धोत्रे, गफुर सय्यद राष्ट्रवादीचे अमोल भिसे, महारुद्र पाटील ॲड. तेजसिंह पाटील, इनायत काजी, छाया पडसळकर, अस्मा मुलानी शिवसेनेचे नितीन कदम , भिमराव भोसले, मेजर महादेव सोमवंशी, काँग्रेस पक्षाचे निवास शेळके, तसेच सामाजिक कार्यकर्ते सुरज धाईंजे, परमेश्वर मखरे, संजय कांबळे, रमेश शिंदे, आझाद सय्यद, शेखर चव्हाण यांच्यासह अनेक इतर पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

*चौकट...*
*सदरच्या आंदोलन हे दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी सुरू असलेल्या सोनम वांनचूक यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी असल्याचे राज्यप्रमुख रा. कॉं.श.प. प्रशिक्षण विभागाचे ॲड. राहुल मखरे यांनी सांगितले.*
close