shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ज्येष्ठ नागरिक संघ काळेवाडीचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

काळेवाडी : वार्ताहर 
ज्येष्ठ नागरिक संघ, काळेवाडी यांच्या वतीने देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास संघाचे ज्येष्ठ सभासद, पदाधिकारी व मार्गदर्शक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाची सुरुवात संघाचे ज्येष्ठ सभासद आदरणीय श्री. गोविंद काका जागीरदार यांच्या हस्ते ध्वजस्तंभाजवळ नारळ फोडून करण्यात आली. त्यानंतर संघाचे अध्यक्ष तथा योगगुरू आदरणीय श्री. सुरेशजी विटकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. संघाचे सल्लागार तथा माजी पोलीस निरीक्षक आदरणीय श्री. सुरेशजी हगवणे साहेब यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना देत सलामी दिली.

यानंतर उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांनी एकमुखाने राष्ट्रगीताचे गायन करून राष्ट्रध्वजाला अभिवादन केले. कार्यक्रमानंतर उपस्थितांना खाऊचे वाटप करण्यात आले.

यावेळी संघाचे अध्यक्ष श्री. सुरेशजी विटकर यांनी आपल्या मनोगतात संघाच्या आगामी उपक्रमांची माहिती देतानाच ज्येष्ठ नागरिक संघासाठी लवकरच नवीन जागा उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. तसेच संघाची पुढील बैठक ३० ऑगस्ट २०२६ रोजी ज्योतिबा गार्डन येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाचे उपाध्यक्ष श्री. सुखदेवजी खेडकर यांनी केले. तर श्री. अशोक टाकळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

देशभक्ती, आपुलकी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने पार पडलेला हा स्वातंत्र्यदिन सोहळा संस्मरणीय ठरला.
०००
close