shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहुरी फॅक्टरी वरील उड्डाण पुलाला श्रेयवादाचे ग्रहण..!📌 डॉ विखे आणि आ. तनपुरे यांची बदनामी खपवून घेतली जाणार नाही.-आप्पासाहेब ढूस


राहुरी फॅक्टरी दि.१४ ऑगस्ट २०२६
राहुरी फॅक्टरी येथील डॉक्टर तनपुरे कारखान्याच्या कार्यस्थळावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नगर मनमाड महामार्ग ओलांडून छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जाणाऱ्या जवळपास ८०० विद्यार्थ्यांसाठी माजी खासदार डॉ सुजय दादा विखे पाटील यांच्या सहकार्याने लोखंडी पादचारी उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. यासाठी जवळपास पाच वर्षांपासून येथील सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब ढूस हे प्रयत्नशील आहेत..
       परंतु.., या पुलाला श्रेयवादाचे ग्रहण लागले असून.. राहुरी फॅक्टरी येथील काही विघ्नसंतोषी मंडळी या पुलाच्या कामात खो घालत असल्याचे निदर्शनास आले असल्याचा आरोप ढूस यांनी केला आहे. 

      पुढे बोलताना ढूस म्हणाले की, या पुलाच्या कामाचे श्रेय ज्यांना घ्यायचे त्यांनी घ्या.. पण या श्रेयवादाच्या लढाईत जनता व लहान मुलांच्या आयुष्याशी खेळू नका.. एकीकडे या विघ्नसंतोषी मंडळीनी विधान परिषद सदस्य आ. प्राजक्त दादा तनपुरे तसेच.. माजी खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांची भेट घेऊन या पुलाची येथे गरज नसल्याचे सांगून.. हा फुल थांबविण्यात यावा अशी विनंती केल्याचे समजते.. आणि दुसरीकडे मात्र डॉ सुजयदादा विखे पाटील आणि आ. प्राजक्त दादा तनपुरे यांच्या सांगण्यावरून या फुलाचे काम थांबले अशी समाजात बतावणी करून हीच मंडळी त्यांची बदनामी करत असल्याचे निदर्शनास आल्याने ढूस यांनी संताप व्यक्त केला आहे..  ज्यांनी या पुलासाठी सहकार्य केले त्यांची बदनामी कुणी करणार असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. असा स्पष्ट इशारा देताना ढूस म्हणाले की, या पुलाचे काम रखडल्याने जर भविष्यात येथे मुलांचा काही अपघात झाला तर मात्र या विघ्न संतोषी मंडळींना सर्वस्वी जबाबदार धरण्यात येईल. तसेच या विघ्न संतोषी मंडळींची नावेही  या मुलांच्या पालकांसमोर तसेच समाज माध्यमात जाहीर करू असे ढूस यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
close