shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विद्यार्थ्यांनी ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्न करावा- विजय कोल्हे*- हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर महाविद्यालयाच्या ज्युनिअर कॉलेजच्या वतीने शैक्षणिक साहित्य व फळे वाटप- स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी केला गौरव

*विद्यार्थ्यांनी ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्न करावा- विजय कोल्हे*
- हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर महाविद्यालयाच्या ज्युनिअर कॉलेजच्या वतीने शैक्षणिक साहित्य व फळे वाटप
- स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी केला गौरव
      इंदापूर: इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय ज्युनिअर कॉलेजच्या वतीने राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वरील मत व्यक्त केले.
    या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला केक कापून मान्यवर, शिक्षक तसेच विद्यार्थ्यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना शब्दरूपी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना यावेळी शैक्षणिक साहित्य व फळे वाटप करण्यात आले.
    ज्युनियर कॉलेजच्या वतीने काव्यवाचन, वक्तृत्व, रांगोळी, निबंध व क्रीडा स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते यातील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले.
   विजय कोल्हे म्हणाले की,' विद्यार्थ्यांनी मोबाईल, रस्ता सुरक्षा नियम, सायबर गुन्हे यासंदर्भाने जागरूक राहिले पाहिजे.माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे शैक्षणिक क्षेत्रातले कार्य मोठे आहे. विद्यार्थ्यांनी आपली स्वप्ने प्रत्यक्षात पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील रहावे .',
    यावेळी संस्थेचे सचिव ॲड. मनोहर चौधरी यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. संस्थेचे संचालक विलासराव वाघमोडे, ॲड. अशोक कोठारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
   संस्थेचे संचालक सुरेश मेहेर, इंदापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष निवास शेळके, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस भीमराव शिंदे , डॉ. भास्कर गटकुळ, कार्यालयीन प्रमुख अभिमन्यू भंडलकर ,वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सदाशिव उंबरदंड यावेळी उपस्थित होते. 
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा.दत्तात्रय गोळे यांनी केले त्यांनी आपल्या प्रास्ताविकात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या उपक्रमाविषयीची माहिती मान्यवरांना दिली.
   प्रमुख पाहुण्यांची ओळख क्रीडा संचालक डॉ. भरत भुजबळ यांनी करून दिली.
  विद्यार्थी प्रमाणपत्राचे वाचन क्रीडा शिक्षक प्रा. बापू घोगरे यांनी केले.
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रोहिदास भांगे यांनी केले.
    आभार प्रा. सुनील सावंत यांनी मानले.
     प्रा.रवींद्र साबळे आणि प्रा. अमित दुबे तसेच सहकारी प्राध्यापक यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केला.
close