अजीजभाई शेख / राहाता;
शिर्डी - महाराष्ट्र पोलीस दलात प्रदिर्घ आणि निष्कलंक सेवा बजावल्याबद्दल शिर्डी वाहतूक शाखेत कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक किरण भास्कर शेलार यांना भारत सरकारच्या गृहमंत्रालयांद्वारे घोषित २५ वर्षाच्या निष्कलंक सेवेचे "उत्कृष्ट सेवा पदक" देऊन अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधिक्षक मा. मुम्मका सुदर्शन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
पोलीस उपनिरीक्षक किरण शेलार यांनी आपल्या सेवाकाळात विविध पदांवर काम करतांना श्रीरामपूर, राहुरी यांसारख्या संवेदनशील भागात अत्यंत कौशल्याने कार्य केले आहे. शहरात कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबतच क्लिष्ट गुन्ह्यायांचा उलगडा करण्याची त्यांची हाथोटी उल्लेखनीय असून त्यांच्या याच कर्तव्यनिष्ठेची दखल घेत अहिल्यानगर पोलीस दलाच्या शिफारसीनुसार त्यांना "निष्कलंक उत्कृष्ट सेवा पदक" हे मानाचे पदक देऊन गौरवण्यात आले.
सदर पुरस्कार स्विकारल्या नंतर श्री.शेलार म्हणाले की, गेल्या २५ वर्षाच्या माझ्या सेवाप्रवासात वरिष्ठांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन व सहकारी यांचे योग्य सहकार्य यामुळेच मी माझे सेवाकर्तव्ये यशस्वीपणे पार पाडू शकलो.
यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कुलबर्गे, अप्पर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती तसेच शिर्डी पोलीस कार्यालयाचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे आणि शिर्डी शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश येसेकर यांनी कौतुक करुन पुढील सेवा कार्यासाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

