ISRO बेंगळुरू भेटीसाठी शुभ्रा भोंगची निवड
व्याहाळी : लोकनेते अजितदादा पवार मॉडेल स्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्याहाळी येथील इयत्ता ७ वीची विद्यार्थिनी कु. शुभ्रा विनया सतेश भोंग हिची ISRO, बेंगळुरू भेटीसाठी निवड झाली आहे. त्याबद्दल केंद्रप्रमुख भारत शेंडे मुख्याध्यापक प्रभाकर लावंड यांच्यासह उपशिक्षक तात्याराम धायतोंडे , खुशाली धायतोंडे , कैलास गावडे व संतोष हेगडे यांच्या सह सर्व मुलांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळा, पालक, ग्रामस्थ आणि शिक्षणप्रेमी नागरिकांकडून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.
शुभ्राने आपल्या गुणवत्तेच्या व मेहनतीच्या जोरावर मिळविलेल्या या यशामुळे व्याहाळी शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) बेंगळुरू येथे प्रत्यक्ष भेट देऊन अंतराळ संशोधनाची माहिती घेण्याची संधी मिळणे ही तिच्यासाठी तसेच शाळेतील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी बाब आहे.
या यशाबद्दल शुभ्राचे सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ तसेच शाळा समितीचे पदाधिकारी, व्याहाळी यांनी हार्दिक अभिनंदन केले असून, तिच्या भावी शैक्षणिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
“शुभ्राचे हे यश व्याहाळी शाळेतील विद्यार्थ्यांना विज्ञान, अंतराळ संशोधन आणि मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देणारे आहे.”

