तुषार महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांची पर्वणी; गणवेश, फलवृक्ष, खाऊ वाटप आणि वृक्षारोपणाचा संकल्प
नगर प्रतिनिधी :
वाढदिवस केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता त्याला सामाजिक बांधिलकीची जोड देण्याच्या उद्देशाने ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्यचे उपाध्यक्ष मा. कु. तुषार संजय महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांमध्ये नागरिकांनी, निसर्गप्रेमींनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच ग्रीन फाउंडेशनच्या सभासद व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
तुषार महाजन यांच्या २१ सप्टेंबर २०२६ रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्याचा संदेश अधिक व्यापक करण्यासाठी उपक्रमांची ही विशेष मालिका आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शालेय गणवेश देण्यापासून ते फलवृक्षांचे वाटप, बालकांना खाऊ वाटप आणि पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण अशा विविध उपक्रमांचा यामध्ये समावेश आहे.
या उपक्रमांतर्गत बुधवार, २३ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल येथे शालेय गणवेश वाटप करण्यात येणार आहे. त्याच दिवशी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आठवडी म्हातोबा येथे मोफत फलवृक्ष वाटप, तर सकाळी १० वाजता लोणी गावातील अंगणवाडी येथे खाऊ वाटप करण्यात येणार आहे.
तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा वृक्षारोपणाचा विशेष कार्यक्रम रविवार, २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७ वाजता तीर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर परिसरात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने वृक्षारोपण करून परिसर हिरवाईने नटविण्याचा संकल्प करण्यात येणार आहे.
वाढदिवसाचा आनंद स्वतःपुरता न ठेवता तो समाजाच्या उपयोगी यावा, निसर्गाचे संवर्धन व्हावे आणि विद्यार्थ्यांना मदतीचा हात मिळावा, या भावनेतून हे उपक्रम राबविण्यात येत असल्याचे ग्रीन फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले.
सामाजिक बांधिलकी, शैक्षणिक प्रगती आणि ‘हरित महाराष्ट्र’ या ध्येयाला पुढे नेत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांमध्ये नागरिकांनी आवर्जून सहभागी होऊन सामाजिक कार्याच्या या उपक्रमाला बळ द्यावे, असे आवाहन ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्यच्या वतीने करण्यात आले आहे.
“झाडे लावा… झाडे जगवा… आणि पुढील पिढीसाठी हिरवेगार भविष्य घडवा!” या संदेशासह ग्रीन फाउंडेशनने तुषार महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांची मागील बऱ्याच वर्षांपासून ही अनोखी सुरुवात केली आहे.

