shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वरूडमध्ये भाजपचा भव्य दहीहंडी उत्सवविजेत्या गोविंदा पथकाला १ लाख १ हजारांचे प्रथम पारितोषिक

आमदार उमेश उर्फ चंदुभाऊ यावलकर, सौ नवनीतताई राणा, रामदासजी तडस व आमदार प्रतापदादा अडसड यांची प्रमुख उपस्थिती

वरुड (जि अमरावती) प्रतिनिधी:
वरूड : भारतीय जनता पार्टी मोर्शी - वरूड विधानसभा मतदारसंघाच्या वतीने येत्या रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव वरुड नगर परिषदेजवळील मराठी शाळेच्या मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
या भव्य दहीहंडी उत्सवाला आमदार उमेश उर्फ चंदुभाऊ यावलकर, माजी खासदार सौ. नवनीतताई राणा, माजी खासदार रामदासजी तडस व आमदार प्रतापदादा अडसड जिल्हा अध्यक्ष (भाजपा ) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

दहीहंडी उत्सवातील विजेत्या गोविंदा पथकांसाठी आकर्षक पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे. प्रथम क्रमांकासाठी १ लाख १ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ५१ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी ३१ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच उत्सवात सहभागी होणाऱ्या सर्व गोविंदा पथकांना प्रोत्साहनपर ५ हजार १ रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

या उत्सवात जास्तीत जास्त गोविंदा पथकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रा. डॉ. सुमित पवार यांनी केले आहे. 
सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पथकांसाठी टीम प्रवेश फी १ हजार रुपये असून, नोंदणीसाठी आयोजकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

*नोंदणीसाठी संपर्क*

- स्वप्नील चौधरी : ९९२२६ ४९४९३
- दिपक पवार : ९७६६१ १३६२१
- आकाश भोजने : ९९७५१ ०५७४७
- दर्शन गावंडे : ७४९९१ १३५०३
आयोजक : भारतीय जनता पक्ष, मोर्शी - वरूड विधानसभा मतदारसंघ.

गोविंदा पथकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन दहीहंडी उत्सवाची रंगत वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार प्रविण सावरकर - वरुड 


*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 
 श्रीरामपूर -
9561174111
close