*भारत ननवरे सर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार*
इंदापूर : स्व. ना. अजित पवार मॉडेल स्कूल, भोसलेवस्ती येथील उपशिक्षक श्री. भारत पोपट ननवरे सर यांना एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय आदर्श संस्था, आदर्श शाळा, आदर्श मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक व आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार सोहळा व शिक्षक मेळावा २०२६ मध्ये राज्यस्तरीय *आदर्श शिक्षक* पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी जिजाऊ मंगल कार्यालय कुंजीरवाडी(पुणे) येथे हा पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. मा. ना. श्री. भरत (शेठ) गोगावले, रोहयो मंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी आमदार शरद (बापू) सोनवणे,मा आ रवींद्र धंगेकर, मंगेश चिवटे,बापूसाहेब अडसूळ, दत्तात्रय गवळी यांच्यासह विविध मान्यवर, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारत ननवरे सर यांच्या शैक्षणिक कार्याची, विद्यार्थ्यांप्रती असलेल्या समर्पणाची, नाविन्यपूर्ण उपक्रमांची आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शिक्षक मित्रपरिवार, पालक व ग्रामस्थांकडून ननवरे सर यांचे अभिनंदन होत आहे.

