shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भाजप शिर्डी शहर उपाध्यक्ष ॲड. सागर सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांकडून सत्कार


सामाजिक, राजकीय व पत्रकारिता क्षेत्रातील कार्याचा गौरव; मान्यवरांकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा

शिर्डी प्रतिनिधी : (तुषार महाजन)
शिर्डी शहरातील सामाजिक कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टी शिर्डी शहर उपाध्यक्ष तसेच ‘एस नाईन न्यूज’चे संचालक ॲड. सागर सिताराम सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सामाजिक, राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रातील पुढील वाटचालीसाठी मान्यवरांनी सदिच्छा व्यक्त केल्या.
ॲड. सागर सावकारे हे शिर्डी परिसरात सामाजिक कार्यासोबतच राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. भारतीय जनता पार्टीच्या शिर्डी शहर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे. समाजातील विविध घटकांशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा तसेच सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
पत्रकारिता क्षेत्रातही ‘एस नाईन न्यूज’चे संचालक म्हणून ॲड. सावकारे कार्यरत असून, स्थानिक प्रश्न, सामाजिक घडामोडी आणि सर्वसामान्यांशी संबंधित विषयांना माध्यमातून स्थान देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. सामाजिक बांधिलकी, राजकीय क्षेत्रातील सक्रियता आणि पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेशी असलेला संवाद यामुळे त्यांनी शिर्डी परिसरात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कारप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब शिंदे, साई श्रद्धा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक आसारामजी वारे, पत्रकार संजय महाजन, पंकज भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते ॲड. सागर सावकारे यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी ॲड. सावकारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक व सार्वजनिक कार्याचे कौतुक केले. भविष्यातही त्यांनी समाजहिताचे उपक्रम राबवत सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी कार्यरत राहावे आणि सामाजिक, राजकीय तसेच पत्रकारिता क्षेत्रात अधिक प्रभावीपणे कार्य करावे, अशा शुभेच्छा मान्यवरांनी दिल्या.

वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मित्रपरिवार, सहकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि हितचिंतकांकडूनही ॲड. सागर सावकारे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
close