विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाची कुस्ती स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी
इंदापूर: इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचालित, विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब वालचंदनगर येथील कुस्तीपटूंनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत असणाऱ्या पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती अंतर महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये नेत्रदीपक यश संपादित केले.
मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर येथे जिल्हास्तरीय कुस्ती मुले व मुली स्पर्धा संपन्न झाल्या.
या स्पर्धेमध्ये महाविद्यालयाची विद्यार्थिनी पै.अहिल्या शिंदे हिने 55 किलो वजन गटामध्ये प्रतिस्पर्ध्यांचा एकतर्फी पराभव करून सुवर्णपदक संपादित केले. पै. अहिल्या हिची अमेरिकेमध्ये संपन्न होणाऱ्या 23 वर्षाखालील जागतिक अजिंक पद कुस्ती स्पर्धेकरिता भारतीय संघात निवड झाली आहे.याप्रसंगी पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती व आयोजक महाविद्यालय यांच्या वतीने या गुणवंत खेळाडूचा विशेष सन्मान करण्यात आला.
पै. अनुष्का हासपे हिने 53 किलो वजनी गटांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करीत सुवर्णपदक संपादित केले. पै. अनुष्का ही राष्ट्रीय तसेच अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविलेली खेळाडू आहे.
पै. समर्थ शिंदे याने 92 किलो वजन गटांमध्ये अत्यंत चुरशीच्या झालेल्या उत्कंठावर्धक लढतींमध्ये नावाजलेल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत सुवर्णपदक खेचून आणले. महाविद्यालयाने स्पर्धेमध्ये एकूण तीन सुवर्णपदकांची कमाई केली. सुवर्ण कामगिरीमुळे महिला गटातील सर्वसाधारण उपविजेतेपद महाविद्यालयास प्राप्त झाले.तीनही खेळाडूंची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत संपन्न होणाऱ्या आंतरविभागीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे.
या यशाबद्दल इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंदी रणसिंग, उपाध्यक्ष प्रकाश कदम, सचिव वीरसिंह रणसिंग, खजिनदार वीरबाला पाटील, विश्वस्त कुलदीप हेगडे,शंकरराव रणसिंग,राही रणसिंग यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे, उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळीग, उपप्राचार्य प्रा. डॉ. प्रशांत शिंदे तसेच सर्व प्राध्यापक व प्राध्यापके तर कर्मचारी उपस्थित होते. महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक डॉ. सुहास भैरट यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले.

