*बनसुडे विद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी*
*पळसदेव, ता. इंदापूर :* येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल. जी. बनसुडे इंग्लिश मीडियम स्कूल & ज्युनियर कॉलेज, पळसदेव येथे २ ऑक्टोबरचे औचित्य साधून महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री. हनुमंत (नाना) बनसुडे,डॉ. शीतलकुमार शहा,कार्याध्यक्षा सौ. नंदाताई (नानी) बनसुडे, सचिव श्री. सुरज बनसुडे, प्राचार्य श्री. संजय इंगोले, मुख्याध्यापिका सौ. सीमा बाराते, उपमुख्याध्यापिका सौ. सुवर्णा वाघमोडे, समन्वयक सौ. तेजस्विनी तनपुरे, विभागप्रमुख श्री. प्रवीण मदने, सौ. ज्योती मारकड, सौ. तनुजा फुगे आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष श्री. हनुमंत(नाना ) बनसुडे यांच्या हस्ते महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्यावर आधारित भाषणे, नाटिका व विविध उपक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीजींचा सत्य, अहिंसा व स्वच्छतेचा संदेश आणि शास्त्रीजींची साधी राहणी व उच्च विचारसरणी यांचे महत्त्व प्रभावीपणे मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. सीमा बाराते यांनी केले. विद्यार्थ्यांनी परिसराची स्वच्छता करून स्वच्छतेचा संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. ज्योती मारकड यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. शुभांगी मराडे यांनी केले.
विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.

