shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

🏆 राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी अमित धोत्रे यांची निवड!

जिद्द, मेहनत आणि दमदार खेळाच्या जोरावर गाठले राज्यस्तरीय यशाचे मैदान

शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा:-

पालघर : प्रचंड गरिबीत खेळाच्या मैदानावर जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर आपल्या क्रीडा कौशल्याची छाप उमटविणारे अमित धोत्रे यांची पालघर येथे होणाऱ्या ५३व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय निवडीमुळे क्रीडा क्षेत्रातून तसेच मित्रपरिवार आणि चाहत्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



कबड्डी हा केवळ खेळ नसून चपळाई, ताकद, संयम, संघभावना आणि जिंकण्याची जिद्द यांची कसोटी घेणारा खेळ आहे. या सर्व गुणांचा योग्य समन्वय साधत अमित धोत्रे यांनी आपल्या दमदार खेळाच्या जोरावर राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत मजल मारली आहे.अमित हा पैलवान राजू मारूती धोत्रे यांचा लहान मुलगा आहे.तर पैलवान आदित्य धोत्रे यांचे लहान बंधू आहेत.यापुर्वीही अमित याने अनेक पुरस्कार पटकावले आहेत.

अमित यांच्या या यशामागे अथक परिश्रम, नियमित सराव, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबीयांचे पाठबळ महत्त्वाचे ठरले आहे. ग्रामीण व सामान्य कुटुंबातील खेळाडूंमध्येही मोठी गुणवत्ता असते, हे अमित धोत्रे यांच्या निवडीने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

पालघर येथे होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय स्पर्धेत अमित धोत्रे आपल्या खेळाची चमक दाखविण्यास सज्ज झाले असून, मैदानावर दमदार कामगिरी करत आपल्या परिसराचे नाव उज्ज्वल करण्याचे त्यांचे ध्येय आहे.

🌟 अमित धोत्रे यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

राज्यस्तरीय कबड्डीच्या मैदानावर यशाचा नवा इतिहास घडवावा आणि भविष्यात राष्ट्रीय स्तरावरही आपल्या खेळाची दखल घेतली जावी, यासाठी हार्दिक शुभेच्छा! 

शिर्डी एक्स्प्रेसचे वृत्तसेवेचे संपादक रमेश जेठे सर व रत्नाकर ठाणगे पाटील जिल्हाध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, दिव्यांग सेल, अहिल्यानगर जिल्हा यांनी मनःपूर्वक धन्यवाद दिले आहेत.

०००


close