*इंदापूर महाविद्यालयात 9 ऑक्टोंबर ते 11 आक्टोंबर दरम्यान तीन दिवसीय महिला बचत गट कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिर*
इंदापूर प्रतिनिधि: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे , जिल्हा परिषद पुणे आणि कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्याचे माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 9 ऑक्टोंबर ते 11 आक्टोंबर दरम्यान तीन दिवसीय महिला बचत गट कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिराचे महाविद्यालयाच्या अमर शेख सभागृहामध्ये आयोजन करण्यात आले.
या प्रशिक्षण कार्यशाळेत इंदापूर तालुक्यातील 200 महिला बचत गट सदस्या प्रशिक्षणार्थी म्हणून उपस्थित होत्या.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे ,उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे ,प्रशिक्षण अधिकारी अक्षय दातार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशिक्षण समन्वयक विभा इंगळे ,कुकडी क्रॉप सायन्स प्रा. लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक ज्ञानदेव आतकरी यांच्या उपस्थितीमध्ये या शिबिराचे उद्घाटन झाले.
कार्यशाळेत बेकरी पदार्थ, मसाला प्रक्रिया, मुरघास प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे प्रशिक्षण आधिकारी अक्षय दातार यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी कार्यशाळेतून मिळालेल्या प्रशिक्षणाचा लाभ महिलांनी आपल्या कौटुंबिक सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी करावा असे सांगितले.
पुणे जिल्हा परिषद महिला बचत गट समन्वयक अमर कदम, राम कांबळे, निर्मला निमगिरे, समाधान भोरकडे तसेच डॉ. भिमाजी भोर, डॉ.शिवाजी वीर ,डॉ. सदाशिव उंबरदंड यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.विद्या गायकवाड यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुवर्णा जाधव यांनी केले.
आभार प्रा. कल्पना भोसले यांनी मानले.