*स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत इंदापूर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केली स्वच्छता*
- महाविद्यालय , बस स्थानक व पंचायत समिती परिसर विद्यार्थ्यांनी केला स्वच्छ.
इंदापूर प्रतिनिधि: उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र शासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर यांच्या संयुक्तपणे स्वच्छता ही सेवा हा उपक्रम राज्याचे माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.
इंदापूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थी कल्याण मंडळ , राष्ट्रीय सेवा योजना , राष्ट्रीय छात्र सेना व कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शहरातील बस स्थानक , पंचायत समिती व महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ केला.
प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी स्वच्छता ही सेवा या उपक्रमाविषयीची विद्यार्थ्यांना माहिती दिली. विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात सामाजिकता हा गुण अंगीकारावा असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
डॉ.तानाजी कसबे , प्रा.प्रशांत साठे, प्रा. दिनेश जगताप , प्रा.सुवर्णा जाधव यांनी हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केला.