shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केजचा सुपुत्र झळकणार रुपेरी पडदयावर मंगळवारी बीड येथे "अंकुश" चित्रपटाचे भव्य प्रमोशन..!!

प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी:-

                                    
बांधकाम व्यावसायिक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण करणारे केज तालुक्यातील टाकळी गावचे सुपुत्र  राजाभाऊ आप्पाराव घुले यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण करत एका बिग बजेट सिनेमाची निर्मिती करून मुलगा दिपराज घुले याची प्रमुख भूमिका असलेला " अंकुश " नावाचा चित्रपट निर्माण करून बीड ते बॉलीवूड असा प्रवास सुरू केला आहे.
            
 
केज  तालुक्यातील टाकळी सारख्या छोट्याश्या गावातून येत  सुरुवातीला छोटे-मोठे व्यवसाय करून जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर बांधकाम व्यवसायामध्ये एक शासनमान्य गुत्तेदार म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. प्रत्येक काम हाती घेतल्यानंतर ते परिपूर्ण करायचे या स्वभावातून त्यांनी अवघ्या महाराष्ट्रात नाव कमावले आहे. 
आणि त्या व्यवसायामध्ये स्थिरस्थावर झाल्यानंतर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या मुलाला चित्रपट सृष्टी मध्ये झळकावण्यासाठी त्यांनी बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली असून दीपराजचा प्रमुख भूमिका असलेला "अंकुश" नावाचा बिग बजेट चित्रपटाची निर्मिती केली आणि  येत्या 6 ऑक्टोबरला तो सर्वत्र प्रदर्शित होत आहे. आणि त्याच अनुषंगाने सदरील चित्रपटाचे प्रमोशन बीड येथे ठेवण्यात आले असून आदित्य डेंटल कॉलेजच्या प्रांगणामध्ये दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता चित्रपटातील सर्व कलाकारांच्या उपस्थितीमध्ये सिनेमाचे भव्य दिव्य असे प्रमोशन ठेवण्यात आले आहे.                                

सदरील चित्रपटांमध्ये दीपराज राजाभाऊ घुले याची प्रमुख भूमिका असून नायिका म्हणून केतकी माटेगावकर ही प्रमुख भूमिकेत झळकत आहे. 

सदरील प्रमोशन साठी चित्रपटातील कलाकारांसह बारामती येथील चांडाळ चौकडी ही विनोदी टीमही यावेळी उपस्थित राहणार असून जिल्ह्यातीलच नव्हे तर मुंबई आणि पुणे येथूनही मोठ्या प्रमाणावर मान्यवर या प्रमोशन साठी उपस्थित राहणार आहेत. बीड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून येत बॉलीवूड पर्यंत एन्ट्री मारणाऱ्या भूमिपुत्राच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जिल्ह्यातील सिने रसिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावण्याचे आवाहन विष्णू घुले यांनी केले आहे*.
close