शिर्डीत एसबीआय लाइफ इन्शुरन्स चे ऑफिस सुरू होणार - संतोष ढमाळ ( शाखा प्रमुख) (बी एम)
शिर्डी : ( संजय महाजन )
भारतातील एक अग्रगण्य जीवन विमा कंपनी एस बी आय लाइफचे (सीईओ, वित्त) संग्रामजीत सारंगी आज शिर्डीत सदिच्छा भेट दिली. शिर्डी शहरात लवकरच एसबीआय लाइफचे कार्यालय सुरू होत आहे. त्या संदर्भात त्यांनी शिर्डी भेट देऊन लायफ मित्र (एलएम) तसेच डेव्हलपमेंट मॅनेजर यांना मार्गदर्शन केले व शिर्डी परिसरातील जास्तीत जास्त लोकाना रोजगार देणार, तसेच इन्शुरन्सचे महत्व समजावून सांगीतले. यावेळी १५५ लाईफ मित्र, १० डेव्हलपमेंट मॅनेजर उपस्थीत होते.
याप्रसंगी ब्रांच मॅनेजर संतोष ढमाळ म्हणाले की, आता पर्यंत एसबीआय लाइफ कंपनी ने १४०,३३७ कोटी परीपक्वता राशी दिली तसेच भारतात ९९० शाखा आहेत आता पर्यत ४,४५,६२,९०४ + पॉलिसी धारक आहेत. लवकरच शिर्डीत एसबीआय लाइफच्या ऑफिस सुरू होणार आहे असे संतोष ढमाळ म्हणाले.
यावेळी श्रीमती पूजा रहाने, सचिन कोते, नितिन शेलार, पायल माड़गे, उत्कर्ष लुटे, प्रसाद पवार, अजिंक्य गायधाने, नितिन दमबीर, विशाल बेलदार, पत्रकार तुषार महाजन व अनेक मान्यवर उपस्थित होते.

