शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
सामाजिक बातमी
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या प्रेरणेने देशभरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात येत असुन आज भाजपा शिर्डी शहराचे वतीने या अभियानाचा शुभारंभ साईनगर रेल्वे स्टेशनवर करण्यात आला.
यावेळी मा नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, मा नगराध्यक्ष कैलासबापू कोते,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर आबा गोंदकर, भाजपा शहराध्यक्ष सचिन शिंदे ,नारायण लुटे,मा नगरसेवक गजानन शेर्वेकर, जगन्नाथ गोंदकर, मंगेश त्रिभुवन,सचिन तांबे, गणेश जाधव,सुधीर शिंदे,शब्बीर सय्यद,रमेश बिडये,किरण बर्डे,पंडित गुडे,संजय सावंत रामहरी आहेर,किशोर भणगे, राजू बर्डे, धनंजय सारंगधर, रफीक मन्सूरी,रविंद्र सोनवणे आदिंसह रेल्वे स्टेशनचे प्रबंधक श्री शुक्ला साहेब, रेल्वे पोलीस अधीक्षक सिन्हा साहेब आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी व रेल्वे कर्मचारी उपस्थित होते.

