shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री साई संस्थान एम्प्लॉईन क्रेडीट को-ऑप. सोसायटी लि., शिर्डीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न


शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
सामाजिक बातमी 

श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडीट को-ऑप. सोसायटी लि., शिर्डीची वार्षिक सर्वसाधारण सभा श्री साईबाबा संस्थान शिर्डीचे साईआश्रम नं.२ इमारतीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

उपस्थित सभासदांचे संचालक श्री प्रतापराव संपतराव कोते पा. यांनी स्वागत केले श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडीट को-ऑप. सोसायटी लि., शिर्डीच्या विद्यमान चेअरमन सौ. श्रध्दा विजय कोते पा. ह्या सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या सभेस मोठ्या संख्येने सभासद वर्ग उपस्थित होता विषय पत्रिकेप्रमाणे विषयांचे वाचन संस्थेचे सचिव श्री नबाजी नामदेव डांगे यांनी केले विषयवार साधक बाधक चर्चा होवुन सर्व विषय एक मताने मंजुर करण्यात आले.

सभेच्या अध्यक्षा सौ. श्रध्दा विजय कोते यांनी आपल्या अध्यक्षीय भाषनात संस्थेच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेत संस्थेचे मार्गदर्शक मा. खासदार डॉ. सुजयदादा विखे  यांचे संकल्पनेतुन संस्थेमार्फत संस्थेचे सभासद व कायम कर्मचारी यांना भेट म्हणुन प्रत्येकी रु.५,०००/- रकमेची मुदत ठेव पावती देण्यात येणार असल्याचे घोषीत केले त्याच प्रमाणे संस्थेचे आधारस्तंभ मा. ना. श्री राधाकृष्णनी विखे पाटील, मार्गदर्शक मा. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे संस्थेस वेळोवेळी मिळत असलेले बहुमोल मार्गदर्शन व सहकार्याबद्दल आभार मानले तसेच संस्थानची मा. तदर्थ समिती, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, सर्व प्रशासकिय अधिकारी, मुख्य लेखाधिकारी, सर्व विभाग प्रमुख त्याच प्रमाणे सर्व सभासदांचे मिळत असलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.

सभेस संस्थेच्या चेअरमन सौ. श्रध्दा विजय कोते, व्हा. चेअरमन दिनेश दिलीप कानडे, संचालक प्रतापराव संपतराव कोते, तुषार सुदामराव शेळके, यादव माधव कोते, जितेंद्र साहेबराव गाढवे, विठ्ठल तुकाराम पवार, दिपक भाऊराव धुमसे, संदिप भाऊसाहेब बनसोडे, सचिव नवाजी नागदेव डांगे, सह सचिव विलास गोरक्षनाथ वाणी तसेच मोठा सभासद वर्ग उपस्थित होता.

सभेच्या शेवटी संचालक तुषार सुदामराव शेळके यांनी सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडण्यास सहकार्य केल्याबद्दल उपस्थित सभासदांचे आभार मानले.
close