गोकुळदास शहा यांच्या प्रतिमेस अभिवादन
इंदापूर प्रतिनिधि : इंदापूरच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या वै. गोकुळदास विठ्ठलदास शहा यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांना इंदापूरकरांनी भावपूर्ण वातावरणात विनम्र अभिवादन केले. पुण्यस्मरण दिनानिमित्त शहा सांस्कृतिक भवन येथे आज (दि. २९) पंढरपूर येथील आजरेकर फडाचे फड प्रमुख ह.भ.प. श्रीगुरु हरिदास रामभाऊ बोराटे महाराज यांचे फुलांचे कीर्तन झाले.
तालुक्यातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांनी वै.गोकुळदास शहा यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी अलोट गर्दी केली होती. मुकुंद शहा, भरत शहा व शहा कुटुंबीयांनी याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

