इंदापूर प्रतिनिधि: इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मध्ये भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी माजी उपसरपंच विठ्ठल कदम, शिक्षण समितीचे उपाध्यक्ष संतोष पासगे यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
 यावेळी ग्रामपंचायत सदस्य गणेश चंदनशिवे, किरण पासगे, भारत चंदनशिवे, संभाजी पवार, श्यामसुंदर माने, दीपक पासगे व विद्यार्थी उपस्थित होते.
२ ऑक्टोबर हा महात्मा गांधींचा जन्मदिवस हा भारतात गांधी जयंती म्हणून आणि जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारतात राष्ट्रीय सुट्टी असते. गांधींना सामान्यतः अनौपचारिकपणे भारताचे राष्ट्रपिता मानले जाते.त्यांना सामान्यत बापू म्हटले जाते.
दोन ऑक्टोबर हा दिवस लालबहादूर शास्त्री यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. लालबहादूर शास्त्री
 हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते. ९ जून, इ.स. १९६४ रोजी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. यांच्या कार्यकाळात इ.स. १९६५सालचे दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध घडले.

