राज्यातील समस्त महिलांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. आजच्याच दिवशी म्हणजे
२२ जून १९९४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री मा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांनी देशातील पहिल्या महिला धोरणाचा पाया रचला : मा. सभापती सौ सुजाता अशोक पवार सदस्य- जिल्हा परिषद, पुणे.
प्रतिनिधी । स्नेहा उत्तम मडावी:
पुणे । महिला, मुलींना आपल्या वडिलांच्या संपत्तीत समान वाटा देण्याचा कायदा करून मा.पवार साहेबांनी महिला सबलीकरणासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. पुरोगामी विचारांचा वारसा जपणारे मा.पवार साहेब नेहमीच समाजातील दुर्बल घटकांच्या मदतीला धावून आले आहेत.
आज सत्तावीस वर्ष पूर्ण झाली या कायद्याची निर्मिती होऊन. विशेष म्हणजे हा कायदा पुढे भारत सरकारने सुद्धा अंमलात आणला. असे अनेक कायदे, निर्णय घेऊन पवार साहेबांनी राज्यातील माता भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे काम केले आहे.